शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

भाजपकडून केवळ आश्वासनांची खैरात

By admin | Updated: July 10, 2016 00:25 IST

काँग्रेस पक्षाने भारत देशातील गोरगरीबांना, शोषित, पिडीत, दलित यांचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरिता कार्य केले आहे.

नितीन राऊत यांचा आरोप : काँग्रेस कार्यकर्ता मेळावा, प्रेमसागर गणव’र यांचा पदग्रहण सोहळाभंडारा : काँग्रेस पक्षाने भारत देशातील गोरगरीबांना, शोषित, पिडीत, दलित यांचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरिता कार्य केले आहे. देशात व राज्यात असलेले भाजप सरकार खोटे आश्वासन देवून जनतेला स्वप्न दाखवित आहेत. गरीब व भोळ्याभाबळ्या जनतेला भुलथापा देवून फसविण्याचे कार्य जोमात सुरु आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा भंडारा जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. नितीन राऊत यांनी केला. येथील मुस्लीम लायब्ररी सभागृहात शुक्रवारी जिल्हा कॉग्रेस कमिटीतर्फे गणविर यांचा पदग्रहण समांरभ तथा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या सोहळ्यात मावळते जिल्हाध्यक्ष जिया पटेल यांच्याकडून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांना पदाचा कारभार सोपविण्यात आला. कार्याध्यक्ष म्हणून मनोहर सिंगनजुडे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, सेवक वाघाये, अनिल बावनकर, प्रदेश महासचिव प्रफुल गुळदे, जिया पटेल, मुजीब पठाण, आशावरी देवतळे, प्रमिला कुथे, प्रमोद तितीरमारे, मधुकर लिचडे, रहिमबाबा पटेल, बशीर पटेल, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा भुरे उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बिएसपी पक्षातून सुमारे ४०० कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सोहळ्याला जिल्ह्यातील तीन हजार कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बंडूभाऊ सावरबांधे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून पक्षाला बळकटी मिळवून द्यावे व संघटनेला मजबूत करावे. कार्यकर्त्यांशी पक्ष नाही व कार्यकर्त्यांमुळे नेता घडतो. एवढी मोठी शक्ती कार्यकर्त्यांत आहे. जिया पटेल यांनी चार वर्ष तीन महिन्यांचा जिल्हा कमिटीचा प्रभारी अध्यक्षपद सांभाळताना भाजपचा प्रभाव असताना जिल्हा परिषद व लाखनी मोहाडी नगर पंचायतीत काँग्रेस् ापक्षाचे अधिकाधिक पदाधिकारी निवडून आणले, असे सांगितले.सेवक वाघाये यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा कार्यकर्ता कुठेही कमी नाही. इमानेइतबारे पक्षाचे कार्य करुन पक्षाशी निष्ठा ठेवून पक्ष संघटनेत काम करतो. येणारी लोकसभेची निवडणूक मित्रपक्षाला न देता काँग्रेस पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यांने लढावे असे मत मांडले.नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी काँग्रेस पक्षाचा विविध संघटनेमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले. एनएसयुआय, युवक कॉंग्रेस ते जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदापर्यंत कार्य करीत असताना पक्षाने कामाची कार्यकुशलता लक्षात घेवून जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी सर्व जाती धर्मातील व प्रवर्गातील ज्येष्ठ व श्रेष्ठ सर्व स्तरातील पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करुन जिल्ह्यातील सक्षम संघटन निर्माण करण्याची हमी दिली. कार्यक्रमाला के. के. पंचबुध्दे, डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, अजय गडकरी, रामलाल चौधरी, युवराज वासनिक, विकास राऊत, विजय रायपुरकर, अनिकजमा पटेल, प्रकाश पचारे, सचिन घनमारे, नारायण तितीरमारे, प्रभु मोहतुरे, शंकर राऊत, मानिकराव ब्राम्हणकर, नंदु समरित, सुनिल गिरेपुंजे, भुमेश्वर महावाडे, आशिष पात्रे, डॉ. विनोद भोयर, अभिजित वंजारी, मार्कड भेंडारकर, प्यारेलाल वाघमारे, प्रेम वनवे, निलकंठ कायते, रेखा वासनिक, होमराज कापगते, प्रदिप बुराडे, सुध्दमता नंदागवळी, ज्ञानेश्वर रहांगडाले, केवळाम लांजेवार, उमेश कठाणे, डॉ. अजय तुमसरे, मंदा गणविर, रमेश डोंगरे, चित्रा सावरबांधे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, मंगला बगमारे, अर्चना वैद्य, ज्योती गणविर, पृथ्वी तांडेकर, स्वाती निमजे, कल्पना भिवगडे, धर्मेंद्र नंदरधने, अर्चना वैद्य, अल्का फुंडे, मंजुषा जगनाडे, बंडू ढेंगरे, वनिता सैयाम, मंगेश हुमणे, मुकूंद साखरकर आदी उपस्थित होते.संचालन राजकपूर राऊत तर आभार प्रदर्शन भुषन टेंभुर्णे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)