शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत केवळ ८.८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:59 IST

प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देवाढत्या तपमानाचा फटकादीड महिन्यात १० टक्के घट

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये १७.६९ टक्के साठा होता. अवघ्या दीड महिन्यात जलसाठ्यात दहा टक्के घट नोंदविण्यात आली. पावसाळा लांबला तर जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे.नागपूर विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत ३८४ सिंचन प्रकल्प आहेत. सध्या १६ मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, ४२ मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि ३२६ लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये १२.५१ टक्के जलसाठा होता. यंदा झालेला अपुरा पाऊस आणि तापत्या उन्हामुळे या प्रकल्पातील जलसाठा कमी होत आहे.नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२७.१९ दलघमी असून एकुण जलसाठा १००१ दलघमी आहे. ४२ मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ९२.०५ दलघमी असून एकुण जलसाठा १६५.०६ दलघमी आहे. ३२६ लघू प्रकल्पात ९०.०८ दलघमी जलसाठा असून एकूण जलसाठा १४३.०२ दलघमी आहे. गतवर्षी मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा होता. यंदा असलेल्या जलसाठ्याच्या तुलनेत ४ टक्के घट आली आहे. दरवर्षी जलसाठ्यात घट येत असून जलपुनर्भरणासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यातच प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून सिंचनाच्या उद्देशाला हरताळ फासला जातो.वाढत्या तापमानाने प्रकल्पातील जलस्तर घटत आहे. विदर्भाचे तापमान ४५ अंशाच्या पार पोहचले आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी घटत आहे. यंदा पावसाळा लांबला तर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्रतलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारात सध्या गावागावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गावागावांतील प्रकल्प तळाला जात आहेत. काही प्रकल्प तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरडे पडले आहे. प्रशासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही गावागावांत पाण्यासाठी ओरड सुरु आहे. भंडारा हा टँकरमुक्त जिल्हा असल्याने जिल्ह्यात कुठेही टँकर सुरु नाही. परंतु भंडारा शहरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई