शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एक लाख हेक्टर धान किडीच्या कवेत

By admin | Updated: October 7, 2015 01:45 IST

धान पिकावर दरवर्षी कीड येत असली तरी यावर्षी या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. भंडारा जिल्ह्यात धानाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ६० टक्के ....

इंद्रपाल कटकवार भंडाराधान पिकावर दरवर्षी कीड येत असली तरी यावर्षी या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. भंडारा जिल्ह्यात धानाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ६० टक्के म्हणजे १ लाख हेक्टरमध्ये किडीने आक्रमण केले आहे. परिणामी यावर्षी अधिक उत्पादनाची आशा धुुसर झाली आहे. सरासरी होणाऱ्या उत्पादनामध्ये १८ ते २० टक्के उत्पादन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक धान आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात १.८० लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात सर्व पिकांची लागवडीची एकूण टक्केवारी ९८ टक्के इतकी आहे. पावसाचा लहरीपणा, वाढते उष्णतामान आणि ऐन धान कापणीच्या पूर्वी लोंबीमध्ये असलेल्या धानावर किडीने हल्ला केला आहे. धानाच्या बुंद्यावर असलेली किड हळूहळू पसरत लोंबीतील दाणा कुरतडत आहे. परिणामी याचा सरळ फटका उत्पादनावर होणार असल्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. राष्ट्रीय बँका, जिल्हा बँक, पतसंस्थांचे कर्ज आणि कुटुंबाची जबाबदारी अशा ओझ्याखाली सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर किडीने पाणी फेरले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांना वगळल्यास आकाशाकडे डोळे लावून असलेल्या शेतकऱ्यांना ‘एका पाण्यासाठी हातचे पीक जाणार’ या भीतीने शेतकरी धास्तावलेला आहे. दुसरीकडे राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत अनुदानावर देण्यात येणाऱ्या औषधींचा पुरवठा अत्यल्प आहे. अशा स्थितीत बळीराजा दोन्ही बाजुने भरडला जात आहे. यास्थितीत भात पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्रात जड धान तर उर्वरीत क्षेत्रात हलके धान आहे. त्यातही किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव हलक्या धानावर आहे. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल आणि पीक होईल, अशी आशा होती, परंतु यावर्षीही पावसाने दगा दिल्यामुळे लागवड खर्चही निघण्याची स्थिती नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.गादमाशी, कडाकरपा, तुडतुड्याचा प्रादुर्भावधान पिकावर तपकिरी, पांढऱ्या पाठिचे व हिरव्या रंगाच्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आहे. धान पिक कापणीच्या हंगामात गादमाशी, कडाकरपा, खोडकिडा, बेरकी, पर्णकोष आदी किड व रोगांचा परिणाम दिसून येत आहे. रोपांची दाट वाढ असलेल्या ठिकाणी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये विखुरलेल्या स्थितीत या किडीचा प्रादुर्भाव आहे. ही किड धान पिकातील रस शोषून घेत असल्याने धानाची लोंबी कमजोर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. महागडी औषध फवारणी करूनही पाण्याचा अभाव व वाढत्या उष्णतेमुळे उपाय नगण्य ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी काही भागात ढगाळ वातावरण असल्याने रोगराईला अधिक बळ मिळाले आहे. परिणामी शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.मागणी लाखांची पुरवठा अत्यल्प जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयामार्फत दरवर्षी किटकनाशकांची मागणी केली जाते. यावेळी मागणी करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील धानपिकाच्या एकूण क्षेत्रापैकी केवय १८० हेक्टर क्षेत्राकरिता औषधे मिळाली. यात अर्धा लिटर याप्रमाणे १९ हजार ८३४ पाऊच तालुका कृषी कार्यालयांना वितरीत करण्यात आले. यात अन्न सुरक्षा योजना व क्रॉप सॅप अंतर्गत देण्यात आले. विशेष म्हणजे यातील क्रॉप सॅप योजनेची औषध केवळ ‘हॉली अफेक्टेड’ क्षेत्रासाठी उपलद्ध करून देण्यात येते. पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात धानपिक घेतले जात असताना औषधांची ही मात्रा अत्यंत अल्प आहे. या औषधांमध्ये कॉपर आॅक्सीक्लोराईड, क्विनोलफॉस, मोनोक्रोटोफास आदी औषधांचा समावेश आहे. धान पिकावर आॅगस्ट महिन्यापासूनच किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा प्रकार बारीक वाणावर अधिक प्रमाणात आहे.कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी, पर्णकोष यासारख्या रोगामुळे धानाच्या लोंबीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - डॉ. पी. आर. शामकुंवर, धान परिक्षण केंद्रप्रमुख, कृषी विज्ञान केंद्र साकोलीधानपिकावर किडीचा प्रादुर्भाव आहे. जिल्ह्यात केलेल्या पाहणीत धानावर गादमाशी, कडाकरपा, खोडकिडा आदी रोग व किड दिसून आली. किडीवर नियंत्रणासाठी कृषी विभाग सर्वतोपरी शेतकऱ्यांना मार्ग़दर्शन करीत आहे. सद्यस्थितीत सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी धानाला पाण्याची गरज आहे. ज्याठिकाणी किडीचा अधिक प्रादुर्भाव आहे त्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी युरीयाची फवारणी करावी.- डॉ.नलिनी भोयर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.