शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

देखरेख समित्या निष्प्रभ

By admin | Updated: February 6, 2017 00:26 IST

१९५८ च्या मुंबई ग्रामपंचायत अधिकार अधिनियमानुसार कलम १४९ नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या विषयानुसार उपसमिती तसेच देखरेख समिती स्थापन करता येते ...

जनजागृतीचा अभाव : अधिकारच अनेकांना ठाऊक नाहीभंडारा : १९५८ च्या मुंबई ग्रामपंचायत अधिकार अधिनियमानुसार कलम १४९ नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या विषयानुसार उपसमिती तसेच देखरेख समिती स्थापन करता येते व त्यानुसार अन्यायग्रस्तांना या समितीच्या माध्यमातून न्याय मिळून गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करुन गावाचा विकास साधला येतो. तसेच एखादा ग्रामपंचायत पदाधिकारी मनमानी करीत असेल तर त्याच्यावर या समितीच्या माध्यमातून वचक ठेवता येते. परंतु या समितीला काय अधिकार आहेत व गरज पडल्यास त्याचा कसा वापर करता येतो, हे समितीच्या सदस्यांना अथवा ग्रामस्थांना माहित नसल्याने या देखरेख समित्या कुचकामी असल्याचे चित्र दिसून येत आहे.तंटामुक्त समिती, पाणी पुरवठा समिती, राशन देखरेख दक्षता समिती, शालेय व्यवस्थापन समिती, दारुबंदी व आरोग्य समिती यासारखा वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळ्या समित्या गावपातळीवर ग्रामसभेमध्ये तयार करता येतात व त्यानुसार संबंधित विभागावर देखरेख ठेवता येते. परंतु परिस्थिती वेगळीच आहे.प्रत्येक ग्रामपंचातीला १२ महिन्यामध्ये चार ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे व त्या घेतल्याही जातात. परंतु बऱ्याच गावामध्ये ग्रामसभेला किंवा वार्षिक सभेला ग्रामस्थांची उपस्थिती नगण्य असते. यामुळे ग्रामसभेचे महत्त्व अजूनही काही नागरिकांना समजलेच नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे गावाच्या लोकसंख्येनुसार ग्रामसभेला ग्रामस्थांची उपस्थिती एक तृतियांश असणे गरजेचे असते. अन्यथा कोरमअभावी ग्रामसभा बरखास्त करुन त्याच ठिकाणी दोन तासांनी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सचिव यांना घेण्याचा अधिकार असतो. त्याचाच फायदा सरपंच, उपसरपंच आपल्या सोयीनुसार शुभचिंतकांना व मनमर्जीतील लोकांना समिती, उपसमिती, देखरेख समिती, दक्षता समितीवर निवड करतात. बऱ्याच जणांना या प्रकाराची जाणीवही नसते. यामुळे गावपातळीवर भ्रष्टाचार होताना दिसतात. गावातील राशन दुकानदार दर महिन्याच्या १२ तारखेच्या आत राशन युनिटप्रमाणे वाटप करण्यात दिरंगाई करीत असेल तर देखरेख दक्षता समितीद्वारे शिस्तभंगाची कारवाई करता येते. यासारख्या गावपातळीवरील समित्या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कामावर नियंत्रण ठेवून ग्रामहित साध्य होवू शकते. एखाद्यावर अन्याय अत्याचार होवूनही असे प्रकरण दाबण्यास गुन्हेगारांना वाव मिळतो. ग्रामपंचायत आपली संसद असते आणि या संसदेमध्ये घेतलेल्या कोणत्याही ठरावाचे खंडण करता येत नाही. त्यासाठी सर्वसामान्य जनतेला याची जाण असणे आवश्यक आहे. आणि म्हणून प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहून ग्रामसभेला उपस्थित असणे गरजेचे आहे. एखाद्या ग्रामपंचायतीचा सरपंच अथवा उपसरपंच, सदस्य अकार्यक्षम असेल तर ७३ व्या घटना दुरुस्तीमधील २४३ व्या कलमानुसार ग्रामसभेला किंवा वार्डसभेला सभा घेवून त्यांना पदावरुन कमी करता येते. यालाच प्रत्यक्ष लोकशाही राज्यव्यवस्था अर्थात डायरेक्ट डेमाक्रेसी राज्य व्यवस्था म्हणतात. तद्वतच काम चुकार करणे व शासकीय मालमत्तेचा घरगुती वापर केल्यास सरपंच अथवा उपसरपंच यांचेसदस्यत्व रद्द करता येते. (शहर प्रतिनिधी)