शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

मान्यता रद्द केल्यानंतरही झाली लाखोंची कामे

By admin | Updated: July 21, 2014 23:42 IST

पालोरा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोहयो अंतर्गत १५ लक्ष रुपयांचे सिमेंट रस्त्याच्या कामांना मोहाडी खंड विकास अधिकाऱ्यांनी तांत्रीक व प्रशासकीय मान्यता अनुक्रमे ४ व ६ जानेवारी ला दिली.

अधिकारी गप्प : प्रकरण मोहाडी तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांचेकरडी (पालोरा) : पालोरा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोहयो अंतर्गत १५ लक्ष रुपयांचे सिमेंट रस्त्याच्या कामांना मोहाडी खंड विकास अधिकाऱ्यांनी तांत्रीक व प्रशासकीय मान्यता अनुक्रमे ४ व ६ जानेवारी ला दिली. त्यानंतर ६०:४० च्या प्रमाणात कुशल अथवा सिमेंट कामे बसत नसल्याचे कारण देत २० जानेवारीला प्रशासकीय मान्यता रद्द करून तसे पत्र पालोरा ग्रामपंचायतीला दिले. मात्र त्या पत्राला न जुमानता ग्रामपंचायतीने जुलै महिन्यात कामांना सुरुवात केली असताना अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली. २०१४ या आर्थिक वर्षात मग्रारोहयोची पाहिजे त्या प्रमाणात कामे झाली नाही. तालुकास्तरावरील अहवालानुसार फक्त ४ लाख ४ हजारांची कामे झालीत. त्यामुळे गावात इतर कामे घेण्यासाठी निधी शिल्लक नव्हता. सदर वर्षात गावात कामे घेण्यासाठी अकुशल व कुशल कामांचे प्रमाण ६०:४० च्या रेशोमध्ये असणे गरजेचे होते. मात्र गाव प्रमाणात बसत नसतानाही खंड विकास अधिकाऱ्यांनी ९ लाख व ६ लाख रुपयाच्या दोन सिमेंट रस्त्याच्या कामांच्या अंदाजपत्रकांना तांत्रीक व प्रशासकीय मान्यता जानेवारीत प्रदान केली. विशिष्ट राजकीय मंडळींना खुश करण्यासाठी दबावात त्यासाठी खेळी खेळली गेल्याची चर्चा आता तालुक्यात रंगत आहे. प्रकरण अंगावर येण्याची शक्यता दिसताच खंडविकास अधिकाऱ्यांनी पालोरा ग्रामपंचायतीला २० फेब्रुवारी रोजी कामे ६०:४० च्या प्रमाणात बसत नसल्याचे पत्र दिले. दिलेली प्रशासकीय मान्यता स्थगित करून पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात येत असल्याचे त्या पत्रात नमूद केले. तांत्रिक अभियंत्यासह अंदाजपत्रकाची तपासणी करून प्रमाणाबाबत अहवाल द्यावा, प्रशासकीय मान्यता घेऊन कामे करावी, अन्यथा त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी अशी स्पष्ट सूचना देण्यासही ते विसरले नहीत.मात्र ग्रामपंचायतीने त्या पत्राला वाटाण् याच्या अक्षता लावीत पुन्हा प्रशासकीय मान्यता न घेता किंवा ६०:४० च्या प्रमाणपत्राचा अहवाल न देता दणक्यात १५ लाखाच्या दोन्ही कामांना सुरुवात केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेले सिमेंट रस्त्याचे एक काम पूर्ण झाले तर दुसरे अपूर्ण असतानाच कामे ग्रामपंचयातीने बंद केलीत. त्यामुळे गावात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.इतर गावातील कामांनाही प्रशासकीय मान्यता?मोहाडी खंडविकास अधिकाऱ्यांनी ६०:४० च्या प्रमाणात न बसणाऱ्या पालोरा गावातील सिमेंट रस्त्यालाच तांत्रीक व प्रशासकीय मान्यता दिली नाही तर तालुक्यातील इतर खास गावांनाही मान्यता प्रदान केल्याचीही बाब राजकीय गोटात चर्चेत आहे. मान्यता देण्यात आलेल्या गावांमध्ये पालोरा, दवडीपार, जांभळापाणी, रोहणा, सालेबर्डी, अकोला, पांढराबोडी गावातील १२ सिमेंट रस्ते व नाली कामांचा समावेश असून जवळपास ९५ लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी प्रदान केली असल्याचे बोलले जाते. राजकीय वर्तूळात चर्चील्या जात असलेल्या बाबींसंबंधी पंचायत विस्तार अधिकारी कुंभरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले त्या गावांमध्ये अद्याप कामांना सुरुवात झालेली नसल्यामुळे प्रश्नच उपस्थित होत नाही. पालोरा वगळता उर्वरीत गावात कामे झाली नाहीत. एवढेच उत्तर त्यांनी दिले. (वार्ताहर)