शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

भाषिक कौशल्यासाठी नवोपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2016 00:49 IST

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी भाषण, संभाषण, वाचन व लेखन या चार मूलभूत कौशल्यांचा विकास गरजेचे आहे.

शेवटच्या दोन तासिका राखीव : ध्वनिक्षेपकावरून अभ्यास, शंकांचे होते सामूहिक निरसनगिरीधर चारमोडे मासळबालकांच्या सर्वांगीण विकासासाठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी भाषण, संभाषण, वाचन व लेखन या चार मूलभूत कौशल्यांचा विकास गरजेचे आहे. कौशल्य आत्मसात केल्यास भाषेवर प्रभुत्व मिळविणे शक्य होते, ही संधी बालकांना उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेवून सुबोध विद्यालयात प्राचार्य जी. एन. टिचकुले यांनी शाळेत नवोपक्रम राबविला आहे.इंग्रजीसारख्या महत्वाच्या भाषेचे ज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावे व इंग्रजी विषयाचा अध्ययनातील अडसर दुर व्हावा यासाठी टिचकुले यांनी या नवोपक्रमाची सुरु केली आहे. त्यांनी सुरू केलेला उपक्रम वाखन्याज्योगा आहे.उपरोक्त चारही मूलभूत कौशल्य विकसित करण्यासाठी वर्ग ५ ते ८ च्या विद्यार्थ्यांना दररोज शेवटच्या दोन तासीका राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यावेळी सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात एकत्र बसवले जातात. ध्वनिक्षेपणावरुन इंग्रजीमधील १० ते १२ ओळींचा अपठित उतारा, पत्र, कथा, विविध काठिण्य पातळीचे शब्द, शब्दसमूह व वाक्यांचे वाचन केले जाते. विद्यार्थी लक्षपुर्वक ऐकून विद्यार्थी त्यांचे टिपण वहीमध्ये करतात. क्षमतेनुसार विद्यार्थी कमी अधिक लिहिण्याचा प्रयत्न करतात. श्रवण करुन लिहिलेल्या मजकुरावर नंतर विद्यार्थी क्षमतेनुसार प्रश्न विचारतात. विद्यार्थी उत्स्फूर्तपणे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. यामुळे एकाचवेळी सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली जाते. यामुळे मुलांचे एकाचवेळी श्रवण, कथन, लेखन, वाचन या मुलभूत कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते.वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विशिष्ट पध्दतीने अपठित उतारा व इतर लेखन साहित्याचा वापर केल्या जातो. लिखित उतारा त्यांच्याकडून वाचून घेतल्या जातो. शिक्षकांनी वाचन केलेल्या उताऱ्याचे विद्यार्थी काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रत्येक शब्दाशब्दांचे अनुकरण करतात. शब्दातील विराम, चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक भाषा, डोळसपणे वाचणे, वाचनाचा उद्देश उच्चारातील विविधता, मूकअक्षरे आदींचा विचार वाचन कौशल्य विकसित करतांना केल्या जातो. आळीपाळीने सर्वच विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करताना, सर्वांनाच यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.भाषण-संभाषण कौशल्यावर विशेष भर देताना गटागटामध्ये विद्यार्थ्यांना आवडीचे विषय, व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभव, इतर विषयांवर संभाषणासाठी प्रोत्साहित केल्या जाते. गटागटातून विद्यार्थी पाच-पाच, दहा-दहा मिनिटाचे सादरीकरण करतात. यावेळी इतर मनोरंजकपणे निरीक्षण करुन अपेक्षित चुका टाळण्याचा प्रयत्न करतात. अशाप्रकारे प्रस्थापित पारंपारिक पध्दतीपेक्षा वेगळा मार्ग अनुसरुन हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.यासाठी विद्यालयातील इंग्रजी शिक्षक एस. जी. हुकरे, सी. एस. नामुर्ते, जी. एस. चारमोडे, व्ही. टी. सार्वे, एन. एच. भुरे, डी. के. घुमुसकर, एच. के. वैद्य, व्ही. एल. कुथे यांची मदत आवश्यक ठरत आहे. खासगी महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बौध्दीक क्षमतेत वाढ होण्यासाठी चालविलेला हा प्रयत्न आदर्श प्रयत्न ठरला आहे.