शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले

By admin | Updated: May 24, 2017 00:19 IST

चंद्रपूर जिल्ह्याकडे दारू पुरवठा करणाऱ्या टोळीला २३ मे च्या मध्यरात्री लाखांदूर पोलिसांनी हेरगिरी करून दोन वाहन ...

लाखांदूर पोलिसांची कारवाई : मुद्देमाल सह ६ लाख ९७ हजार रुपयांची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : चंद्रपूर जिल्ह्याकडे दारू पुरवठा करणाऱ्या टोळीला २३ मे च्या मध्यरात्री लाखांदूर पोलिसांनी हेरगिरी करून दोन वाहन तालुक्यातील परसोडी-आसोला गावादरम्यान रंगेहात पकडले. यात दारूसह ६ लाख ९७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सचिन बालाजी रेफळवार (२५) रा.जभळापूर ता.सिंदेवाही, अमोल ब्रिजलाल जैस्वाल (२९) रा.गिरगाव ता.नागभीड, वैभव पुरुसोत्तम जगनाडे (२५) रा.मकरढोकडा ता. भंडारा, राहुल कांकरवार रा.सिंदेवाही, निखिल सुरेवर रा.सिंदेवाही अशी अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहे.पवनी व लाखांदूर तालुक्यातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू पुरवठा होत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी मिळाली होती.यामुळे अवैध दारू पुरवठा करणाऱ्यांवर जिल्हा पोलिसांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलिस दारू पुरवठा करणाऱ्या टोळीवर शिकंजा कसायला सुरूवात केली आहे. याअंतर्गत कारवाईचे सत्र जोमात सुरू आहे. २३ मे रोजी गस्तीवर असतांना लाखांदूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. यावरून लाखांदूर पोलिसांनी परसोडी-आसोला दरम्यान चारचाकी क्र. एमएच ३६ एफ ५६४७ या गाडीची झडती घेतली असता यात देशी दारूचे ४८ पेट्या, किंमत १ लाख २४ हजार ८०० रुपये, तर ३ लाख रुपये किमतीचे वाहन पकडण्यात आले. दुसरे चारचाकी वाहन एमएच ३१ - ९४३०, या वाहनांची झळती घेतली असल्यास त्यात २५ खरड्याच्या पेट्या किंमत ६५ हजार रुपये, व गाडी किंमत २ लाख रुपये, व ६ मोबाईल किंमत ७५०० रुपये असे मिळून ऐकून ६ लाख ९७ हजार ३०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सिकस यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक बबन रामदास फूसाटे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिपाई किशोर फुंडे, सचिन कापगते, नितीन बोरकर, राजेश पंचबुद्धे, प्रमोद चेतुले, अमितेशकुमार वडेटवर आदी कर्मचारी उपस्थित होते. अवैध दारू पुरवठा करणाऱ्याचे आता धाबे दणाणले आहे. १५ दिवसातूनही दुसरी कारवाही असल्याने दारू पुरवठा करणाऱ्यांचे सिकांजे कसने सुरू केल्याने आता तरी यावर आळा बसणार अशी शक्यता आहे. तपास लाखांदूर पोलिस करीत आहेत.