शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

विकतचे पाणी शुद्ध किती?

By admin | Updated: April 1, 2015 00:39 IST

वास्तविक पिण्याचे पाणी हा आरोग्याशी निगडित अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करून व्यावसायिकरीत्या विकायचे असेल ...

भंडारा : वास्तविक पिण्याचे पाणी हा आरोग्याशी निगडित अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करून व्यावसायिकरीत्या विकायचे असेल तर इंडियन स्टँडर्ड ब्युरोच्या निकषानुसार आणि विविध विभागांच्या परवानगी घ्याव्या लागतात. पण कोणत्याही परवानगीशिवाय जिल्ह्यात पाणी विक्री सुरू आहे. शासकीय अधिकारी खोलात जाऊन चौकशी करीत नसल्याने बनावट पाण्याचा ‘बाजार’ वाढला असून विकतचे पाणी खरंच शुद्ध आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशुद्ध पाण्याची विक्री जोरातप्लास्टिकची सीलबंद बाटली किंवा प्लास्टिकचा कॅन यातील पाणी म्हणजे शुद्ध पाणी या बऱ्यापैकी रूढ झालेल्या समजुतीचा फायदा घेत नागपुरात बनावट पाणी विकले जात आहे. अधिकृत ब्रँडेड कंपन्यांच्या पाण्याच्या दरापेक्षा हे बनावट पाणी स्वस्त असल्याने त्याचाच वापर वाढतो आहे. विशेषत: सार्वजनिक समारंभातून हेच बनावट पाणी लोकांना पाजले जात आहे. पालिकेचा टँकर टाकीमध्ये ओतायचा व त्याच पाण्यावर थोडी प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध पाणी म्हणून कॅनमधून विकले जात आहे. वास्तविक अशा बनावट पाण्याची विक्री हा लोकांच्या आरोग्याशी घातक खेळ आहे. अवघ्या पाच-दहा पैसे किमतीचे पाणी शुद्ध म्हणून १०-१५ रुपये लिटरने विकण्याची वृत्ती तर त्याहून घातक आहे. त्यामुळे पाण्याच्या या धंद्यात कुठे कुठे पाणी मुरते, हे पाहण्याची गरज आहे. विना परवाना उत्पादन रेल्वेस्थानक, हॉटेल किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची अवस्था तर खूप वाईट आहे. या परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याची काळजी म्हणून शुद्ध केलेले पाणी विकत घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. २० रुपयांची एक बाटली घेतली तर तहान भागतेच. पण अशुद्ध पाण्याची चिंता मिटते. ही भावना त्यामागे असते. बॅ्रण्डेड कंपन्या पाण्याच्या शुद्धतेबाबत नक्कीच खबरदारी घेतात किंवा दर तीन महिन्याला त्यांना विविध विभागांच्या तपासण्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे खबरदारी घ्यावीच लागते. परंतु हे झाले परवानगी घेणाऱ्या पाणी उत्पादक कंपन्यांबाबत. शहरात असे काही पाणी उत्पादक आहेत, की त्यांनी विनापरवानाच पाणी उत्पादन सुरू केले आहे आणि त्याची विक्रीही जोरात सुरू आहे. हे पाणी केवळ प्लास्टिक कॅनमध्ये सील केले जाते म्हणून शुद्ध म्हणायचे, अशी परिस्थिती आहे.