शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोफत प्रवास योजनेचा बट्याबोळ

By admin | Updated: July 14, 2016 00:38 IST

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.

कसे शिकणार विद्यार्थी : मुख्याध्यापक व आगारप्रमुखांनी फिरविली पाठ शिवशंकर बावनकुळे साकोली एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. याशिवाय अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास सवलत योजनेअंतर्गत शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात किंवा बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एस.टी. बसने मोफत प्रवासाची सोय करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत संबंधित मुख्याध्यापक आणि आगारप्रमुख यांची भूमिका महत्त्वाची आहे. असे असताना त्यांच्या दुर्लक्षामुळे या कल्याणकारी योजनेचा पुरता बट्याबोळ झाला आहे. विद्यार्थिनींना बसच्या पाससाठी दर महिन्याला पैसे मोजावे लागतात. ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहिल्या होळकर मोफत प्रवास योजना लागू केली. ही योजना १९९६ पासून लागू करण्यात आली असून या योजनेत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवासाची सोय केली. विद्यार्थिनींना हा प्रवास एस.टी. बसने करावयाचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी घालण्यात आल्या आहेत. त्या सर्व अटी व नियमांची पूर्तता केल्यास संबंधित विद्यार्थिनीला या योजनेचा लाभ मिळतो. यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत संबंधित विभागाकडून माहिती मागण्यात आली. त्यात वेगळेच तथ्य समोर आले. या योजनेअंतर्गत मिळणारी सवलत ही केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी आहे. ज्या गावात माध्यमिक शिक्षणाची सोय असूनही त्या गावातील विद्यार्थिनी शिक्षणासाठी दुसऱ्या गावात किंवा शहरात जात असल्यास त्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पात्र विद्यार्थिनींचा तपशील संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाकडे पाठवायचा असतो. मुख्याध्यापक या योजनेतील अटीकडे दुर्लक्ष करतात. मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचे लक्ष केवळ शाळेतील पटसंख्या टिकवून ठेवण्यावर असते. त्यातून ग्रामीण भागातील शाळामधील मुख्याध्यापकांकडून आगारप्रमुखांना चुकीचा तपशील पाठविला जातो. या तपशिलाची शहानिशा करण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही. दुसरीकडे या योजनेचा विद्यार्थिनींना लाभ न मिळता शासनाच्या शिक्षण विभागाकडून परिवहन मंडळाला निधी दिला जातो. परिणामी ग्रामीण भागातील शाळांमधील पटसंख्या कमी होत गेल्याने त्या शाळांमधील शिक्षण अतिरिक्त ठरायला लागले. दुसरीकडे शहरातील शाळांमधील वर्ग तुकड्यांची संख्या वाढू लागली. ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य मोफत प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती किमान ७५ टक्के असावी तसेच प्रमाणपत्र आगार व्यवस्थापकाकडे सादर करावे लागते. ही संपूर्ण माहिती शाळेकडून प्राप्त झाल्यानंतर आगार प्रमुख संबंधित विद्यार्थिनींना प्रवासासाठी मोफत तिमाही पास उपलब्ध करून देतात. दुसरीकडे शाळेकडून शिक्षणाधिकारी कार्यालयाला देयके सादर करावी लागतात. शिक्षण विभागाच्या कोषागारास ही देयके प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थिनींच्या प्रवास खर्चाच्या रकमेचा धनादेश किंवा डिमांड ड्राफ्ट परिवहन मंडळाकडे पाठविला जातो. मोफत प्रवासाची ही सोय परिवहन मंडाळकडून नव्हे तर शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिली जात असल्याचे माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे.