लाखनी : शासन नागरिकाच्या आरोग्यावर कोट्यावधीचा खर्च करीत असतो. मात्र या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने स्वच्छ आहार व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. परंतु ग्रामीण भागात जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जलजन्य आजार पसरण्याची भिती व्यक्त होत आहे. पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. मात्र ग्रामपंचायतीला दुर्लक्षितपणामुळे अनेक गावात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात न आल्यामुळे नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे.ग्रामपंचायत ही गावाची प्रमुख संख्या म्हणून ओळखली जाते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची कामे केली जातात. ग्रामपंचायतीचाकारभार मुख्यत: ग्रामसेवक सांभाळत असतात. यातही ग्रामसेवकाला अनेक कामे असल्याने ग्रामसेवक सुद्धा दुर्लक्ष करतात तेव्हा पदाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे असते. गावातील नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही याची खबरदारी सरपंच व ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.जलशुद्धीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. अशुद्ध व दुषित पाण्यामुळे जलजन्य आजारात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत टाकीमध्ये येणारे पाणी शुद्ध करूनच नागरिकांना पुरविणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत पावसाळा असून नदी नाले तलावालानी पाण्याची पातळी वाढ झाली आहे. यामुळे विहिरीतील पाणी दूषित येत असते. याचा परिणाम पिण्याकरीता या पाण्याचा वापर ज्या नागरिकांकडून केला जातो. त्याच्या आटोक्यावर निश्चितच पडत असतो. दुषित पाण्यामुळे विषाणू शरीरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीसाठी पिण्याच्या पाण्यात ब्लीचिंग पावडर घालणे आवश्यक आहे. तेही मात्र ग्रामीण भागात कागदावरच असते. यासोबतच जलशुद्धीकरण यंत्राकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे लाखनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे. उपाययोजना न केल्यास आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा तसेच अन्य जलजन्य आजार होत असतात. बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये नियमित पाण्याचे शुद्धीकरण होत नसल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. या बाबीकडे सरपंच, सचिव व ग्रामपंचयत पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)
जलजन्य आजाराची भीती
By admin | Updated: August 6, 2014 23:41 IST