शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:39 IST

भूगर्भातील जलस्त्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देभूगर्भातील पाणी आटले : ५५ टक्के शेतकºयांची रोवणी थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : भूगर्भातील जलस्त्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. सध्या शेतकरी रोवणी व पीक वाचविण्यासाठी केवीलवानी धडपड करीत आहे.कर्जमाफी व अनुदानासाठी बँकेत तसेच आॅनलाईन फार्म भरण्यासाठी महा ई सेवा केंद्रात शेतकरी चकरा मारीत आहे. दिवसभर उपाशी राहून शासनाकडून काही मदत मिळेल या आशेने शेतीचे कामे सोडून शेतकरी बँकेच्या चकरा मारताना दिसून येत आहे. शासनाकडून हा होत असलेला ससेमीरा संपवून जे शेतकरी त्या योजनेत बसत असतील त्यांना कर्जमाफी किंवा सवलतीचा फायदा द्यायला पाहिजे. मात्र सध्यातरी असे होताना दिसत नाही. ज्या शेतकºयांची रोवणी आटोपली त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र पावसाने दगा दिल्याने रोवणी सुकु लागली. त्यामुळे यंदा भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे.महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प असताना शेतकºयांच्या शेतीला अपेक्षेनुसार पाणी मिळत नसेल तर येथील शेतकºयांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. दिव्याखाली अंधार अशीच काहीही परिस्थिती पवनी तालुक्यातील शेतकºयांची झाली आहे. त्याचप्रमाणे धरणामुळे भूगर्भात झिरपणारे पाणी पूर्णत: बंद झाल्याने सिंचनाच्या शेतीतील विहिरीतील पाणी आटले असून चौरास भाग वाळवंट होत आहे. धरणाच्या खालील नदीपात्रातील रेतीघाटांवर निर्बंध लावणे अत्यावश्यक आहे. नाहीतर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा भीषण संकट जनतेसमोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. जल हे जीवन असताना याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने जनता हैराण झाली आहे. शासनाने जनतेच्या व शेतकºयांच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढून शेतकरी वाचला पाहिजे असे धोरण तयार करावे.शेतकºयांच्या मनात यंदा दुष्काळाची प्रचिती होत असून मुख्य डावा कालवा असूनही रेंगाळत चालल्याने शेतीला पाणी देता येत नाही. मिळेल त्या पद्धतीने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहे. काही शेतकºयांनी रक्ताच्या कडेचे जेसीबी मशीनद्वारे तयार करून इंजीनच्या माध्यमातून पाणी देण्याचे खर्चिक कार्य सुरु केलेले आहे. रस्त्याच्या कडेच्या नाल्याच गायब झाल्याने पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासना गंभीर दिसून येत नाही.शेतकरी दरवर्षी पिकविमा काढतो. मात्र काही बोटावर मोजण्याऐवढ्या लोकांनाच त्याचा लाभ मिळतो. विम्याबाबत शासनाने लावून दिलेले नियम चुकीचे असल्याची म्हणणे शेतकºयांचे आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात असलेली त्रिस्तरीय समिती कागदावरच कार्य करते की काय अशी भावना शेतकºयांमध्ये उमटत आहे. सध्या शेतकरी नैराश्येच्या गर्तेत असून इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती उद्भवली आहे.