शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

यंदा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 8, 2014 23:19 IST

यंदा मान्सूनने दडी मारून बसल्याने पावसाचा थांगपत्ता नाही. परिणामी साकोली तालुक्यातील ५० टक्के पऱ्हे वाळले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी असून पावसाची हीच परिस्थिती कायम राहिली

साकोली : यंदा मान्सूनने दडी मारून बसल्याने पावसाचा थांगपत्ता नाही. परिणामी साकोली तालुक्यातील ५० टक्के पऱ्हे वाळले असून शेतकऱ्यावर दुबार पेरणीची पाळी असून पावसाची हीच परिस्थिती कायम राहिली तर कृषी उत्पन्न घटन्यासोबतच पाणी आणि जनावरांचा चारा या गंभीर संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने सोकली तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पेरण्या व रोवण्या रखडल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार साकोली उपविभागातील साकोली, लाखनी व लाखांदूर या तिनही तालुक्यात पावसाअभावी शेतीची कामे रखडली असून आतापर्यंत फक्त पेरणीची कामे उरकली असून तिन्ही तालुक्यात ९० टक्के एवढे पेरण्या झाल्या असून ज्या शेतकऱ्याजवळ पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. हे प्रमाण अत्यल्प आहे. यात साकोली तालुका ९ हेक्टर, लाखनी तालुका १८ हेक्टर तर लाखांदूर तालुका ५ हेक्टर असा आहे. मागील वर्षीच्या मानाने यावर्षी जून महिन्यात पावसाचे प्रमाण नाहीच्या बरोबर आहे व जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला पाणी नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक गणितच बिघडली. पेरणी झाल्यानंतर साधारणत: पंधरा ते वीस दिवसानंतर रोवणीची वेळ असते. रोवणी झाल्यानंतर धानाची जात पाहून त्याचे ठराविक दिवस असतात. हलका धान ११० ते १२० दिवस, मध्यम प्रतीची १३५ ते १४० दिवस, भारी प्रतीचा धान १४५ ते १५० दिवस असे असून पिक उत्पादनासाठी जून ते आॅक्टोबर हा कालावधी १५० दिवस भात शेतीसाठी अनुकुल असा समजला जातो. मात्र यावर्षी पावसाच्या प्रतिक्षेत एक महािं असाच उलटल्याने यावर्षी उशिरा पाऊस आला तरी भातपिकाच्या उत्पन्नावर नक्कीच फरक पडणार आहे. पावसाची अशीच स्थिती राहिली तर उत्पादनाबरोबर पाणी व गुरांच्या चाऱ्याचीही कमतरता भासेल. यात शंका नाही. तर यावर्षी शासनाने शेतकऱ्यांना महाबिज या बियाण्यावर मिळणारी सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यावर हाही एक ओझाच चढला आहे. यावर्षी साकोली तालुक्यासाठी कृषी केंद्रात ८ हजार ६५३ क्विंटल बियाणे आले असून पैकी ४ हजार ६९९ क्विंटल विक्री झाले तर खत ५ हजार १८२ मॅट्रीक टन पुरवठा झाला. पैकी ५४९ मॅट्रीक टन विक्री झाले व उर्वरीत ४ हजार ६३३ मॅट्रीक टन खताचा साठा शिल्लक आहे. पंचायत समितीचे कृषी विभाग व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सज्ज असून शेतकऱ्याप्रमाणेच या विभागांनही पावसाची प्रतिक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)