झिरोबा येथील घटना : ग्रामीण भागात उद्रेक सुरूचलाखांदूर : तालुक्यात झिरोबा येथील मनाबाई नामदेव देसाई (ं५०) यांचे डेंग्यूने गुरूवारी रात्री मृत्यू झाला. तर पती नामदेव देसाई (६०) यांनाही डेंग्यची लागण झाली असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. मनाबाई देसाई यांना डेंग्यू आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. तर पती नामदेव यांनाही डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पत्नीचा मृत्यू झाला असून तेही डेंग्यू या आजाराशी झुंज देत आहे. लाखांदूर तालुक्यात डेंग्यू आजाराने थैमान घातले असून शाळकरी मुलांची संख्या जास्त आहे. दररोज ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण दाखल होतात. परंतू योग्य निदान लागत नसल्याने तसेच डेंग्यू आजाराची तपासणी करण्याचे साहित्य उपलब्ध नसल्याने मृत्युचे प्रमाण वाढतच आहे. दररोज डेंग्यूचे रुग्ण भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले जातात.खाजगी रुग्णालयात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढतच आहे. ब्रम्हपुरी-वडसा, साकोली येथील खाजगी रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. यापूर्वी मडेघाट, चिचोली व अन्य गावात डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना नागरिकांमध्ये भिती निर्माण करणारी ठरली. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने धूर फवारणी केली नाही. सांडपाण्याचे नियोजन न केल्याने आजाराच्या प्रमाणात वाढले आहे. तालुका आरोग्य विभागाने डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती केले नसल्याचा आरोप होत आहे. ग्रामीण रुग्णालयात डेंग्यू आजाराची तपासणी करणारे साधन उपलब्ध करून देण्यत आली नाही. मनाबाईच्या मृत्यूने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)आतापर्यंत १० दगावले४डेंग्यू या आजाराने यावर्षी आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून ३८ जणांना लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यावर जनजागृती सुरू असून धूर फवारणी करण्यात येत आहे. नागरिकांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
डेंग्यूने महिलेचा मृत्यू पतीची प्रकृती अत्यवस्थ
By admin | Updated: September 20, 2014 01:25 IST