आंधळगाव : आंधळगाव येथील ग्रामपंचायत मोहाडी तालुक्यात एक प्रतिष्ठीत व मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. या ग्रामपंचायतीत १५ ग्रामपंचायत सदस्यांची संख्या असून ११ ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची सत्ता स्थापन आहे. ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभा घेण्यात आली.या ग्रामसभेत विकासासंदर्भात चर्चा होण्यापूर्वी ग्रामविकास अधिकारी हटाव असा नागरिकांनी आक्षेप घेऊन सर्वानुमते ठराव पास करण्यात आला. त्यांना हटविण्याची मागणी केलेली आहे. या संबंधी पत्र मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदनाद्वारे दिले आहे.३०० नागरिकांच्या उपस्थितीत संजय श्रीराम मते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यात ग्रामविकास अधिकारी ए.एन. धमगाये यांची बदली करण्याचा विषय राजेश बुराडे व राजेश मते यांनी ठेवला.याला ग्रामस्थांनी साथ देऊन बदलीची मागणी केली. ए.एम. धमगाये हे सन २००९ पासून आंधळगाव ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रकारचे वाद, आरोप प्रत्यारोप करण्यात आले. दोनदा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली. मात्र काही झाले नाही. राजेश बुराडे, राजेश मते यांनी मुकाअ व खंडविकास अधिकारी यांना केलेल्या निवेदनात अनेक प्रकारचे आरोप असून त्यांना हटविण्याची मागणी केली आहे. मात्र ते न झाल्यास चक्का जाम आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)
ग्रामविकास अधिकाऱ्याला हटवा
By admin | Updated: September 3, 2014 23:08 IST