लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रासमोरील धान पोती नळाच्या पाण्यांनी तसेच मोकाट जनावरांच्या नासधुसमुळे तुमसर तालुक्यातील बघेडा येथील शेतकरी प्रकाश दुर्गे यांच्या धानपोतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकसान झालेल्या धानाची भरपाई देणार कोण? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.यापुर्वीच शेतकरी धानपिकाच्या रोगराईवर महागडी किटकनाशक मारुन संकटात सापडला. खर्च जास्त नफा शुन्य, असा प्रकार असुन कर्ज बोझा असलेल्या शेतकऱ्यांवर संकट वाढत चाललेला आहे.शेतात पडलेले एक एक धान वेचून शेतकरी पोती भरतो, दोन पैसे जास्त मिळतील, या आशेने शेतकरी आधारभूत केंद्राची धाव घेतो. परंतु बघेडा येथील विविध कार्यकारीचा आधारभूत केंद्र सुरक्षीत नाही. धान पोती मुख्य रस्त्याच्या कडेला असल्यामुळे मोकाट जनावरे पोती फोडून धान फस्त करुन रस्त्यावर अस्तव्यस्त करतात. तर दुसºया बाजूने नळाच्या पाण्यामुळे धान पोती ओली होतात. याला जबाबदार कोण? असा सवाल आहे. आधारभूत केंद्रावर व्यवस्था व राखणदाराची गरज आहे.या आधारभूत केंद्रावर जागा अपुरी आहे. तर सोबतच मोजणी करुन पोती गोडावूनमध्ये घालायला पाहिजे. परंतु शेतकरी प्रकाश दुर्गे यांच्या नंतर आलेल्या धान पोतीची मोजणी झाल्याचे सांगण्यात आले मग या शेतकºयांची पोती जागेवरच का? याकडे प्रशासनानी तातडीने लक्ष पुरविण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरी आपल्या धान्याच्या सुरक्षेसाठी वाट्टेल ते आंदोलन करण्याच्या प्रयत्नात आहेत.केंद्रावर धान देण्याकरिता आवश्यक कागदपत्रे व मजूर खर्च देण्यास तयार आहे. याबाबत संस्थेला पत्र देवून विवरण मागीतला. विवरण न देता धान पोतींची सर्रास नुकसान होत आहे. याची चौकशी करुन भरपाई देण्यात यावी.- प्रकाश दुर्गे,शेतकरी, बघेडा
आधारभूत केंद्रावर धानाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:01 IST
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रासमोरील धान पोती नळाच्या पाण्यांनी तसेच मोकाट जनावरांच्या नासधुसमुळे तुमसर तालुक्यातील बघेडा येथील शेतकरी प्रकाश दुर्गे यांच्या धानपोतींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आधारभूत केंद्रावर धानाची नासाडी
ठळक मुद्देबघेडा येथील प्रकार : नुकसान भरपाई देणार कोण? शेतकऱ्यांमध्ये संताप