शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

काँग्रेसला यावर्षीची कोजागिरी लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 21:53 IST

पवनी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोजागिरी कार्यक्रम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सोबत आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी एबीव्हीपी संघटना सोडून एनएसयुआय संघटनेत प्रवेश घेतला. त्यामुळे यावर्षीची कोजागिरी ही काँग्रेस पक्षाला नवचैतन्य देणारी ठरली.

ठळक मुद्देपदाधिकारी, कार्यकर्त्यांत जल्लोष : एबीव्हीपीच्या ४० विद्यार्थ्यांचा एनएसयुआयमध्ये प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोजागिरी कार्यक्रम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे सोबत आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी एबीव्हीपी संघटना सोडून एनएसयुआय संघटनेत प्रवेश घेतला. त्यामुळे यावर्षीची कोजागिरी ही काँग्रेस पक्षाला नवचैतन्य देणारी ठरली.गांधीभवन पवनी येथे आयोजित कोजागिरी कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या अध्यक्षतेखाली पवनीचे माजी नगराध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसचे सचिव प्रकाश पचारे, जि.प. माजी सभापती विकास राऊत, प्रगती नागरि पत संस्थेचे अध्यक्ष विजय रायपुरकर, नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, जि.प. माजी सदस्य मोहन पंचभाई, शंकरराव मुनरतीवार, नगरसेवक गोपाल नंदरधने, ताराचंद तुळसकर, राकेश बिसने, वंदना नंदागवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.याप्रसंगी पवनी शहर युवक काँग्रेसचे नवीन कार्यकर्ते सक्रीय होऊन युवक काँग्रेस संघटन तयार करण्यात आले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी एबीव्हीपी संघटना सोडून एनएसयुआय संघटनेत प्रवेश घेतला. त्यावेळी पवनी शहर युवक काँग्रेसचे मंगेश भोयर यांच्या नेतृत्वाखाली धनंजय भोयर, धनराज खडसे, अजय डोंगरे, किशोर दिघोरे, तुषार भोगे, अक्षय बिसेन, फजल खान, ऐफाज अली युवक काँग्रेसची कार्यकारिणी गठण करण्यात येऊन बंडूभाऊ सावरबांधे आणि प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते काँग्रेसचे दुप्पटे व टोपी घालून सत्कार करण्यात आला.एबीव्हीपीच्या कार्याला व हुकुमशाहीला कंटाळून ४० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एबीव्हीपी संघटनेला रामराम ठोकून महेश नान्हे यांच्या नेतृत्वाखाली तुषार भोगे, मंगेश वंजारी, राहुल जिभकाटे, शुभम कारंभे, दिगांबर नागपुरे, गौरव धुर्वे, असलम शेख, अखिल मुंडले, इरफान शेख, अलताफ पटेल, विष्णू बावनकर, सूरज मेश्राम, आशिष मेश्राम, हिमांशू थोटे, निशांत शिवरकर व इतर विद्यार्थ्यांनी काँग्रेसच्या एनएसयुआय संघटनेमध्ये प्रवेश घेऊन पवनी शहर एनएसयुआय संघटन मजबूत करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या एनएसयुआयच्या माध्यमातून सोडविण्याची शपथ घेतली. या ४० विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बंडूभाऊ सावरबांधे, विकास राऊत, मोहन पंचभाई यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश पचारे तर आभार शशीकांत भोगे यांनी केले.