शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सुसंस्कार शिबिरातून घडतात मुले

By admin | Updated: May 30, 2014 23:28 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रणालीनुसार श्री गुरूदेव सेवा मंडळाचे संक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिढीला मानव धर्माचा विश्‍वशांतीचा व विश्‍व बंधुत्वाचा दिव्य संदेश देणार्‍या साधुसंत

भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रणालीनुसार श्री गुरूदेव सेवा मंडळाचे संक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिढीला मानव धर्माचा विश्‍वशांतीचा व विश्‍व बंधुत्वाचा दिव्य संदेश देणार्‍या साधुसंत व महान पुरूषांच्या कार्य कर्तव्याची जाणीव व्हावी आणि प्रेरणा मिळावी, हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. प्रत्येकच आई वडिल हे मुलांवर संस्कार करतात परंतू त्यांचे सुसंस्काराकडे दुर्लक्ष असल्याचे दैनंदिनीतून दिसून येत असल्याचे मत भंडारा जिल्हा सत्यवादी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश धांडे यांनी केले. तुमसर तालुक्यातील माडगी देव्हाडा बु. येथे वैनगंगा नदीच्या पात्रातील टेकडीवर असलेले श्री नरसिंह मंदीर देवस्थान असून येथेच पं.पु. अण्णाजी महाराज योचे आश्रम असून या आश्रमाच्या ठिकाणी वंदनिय अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम अंतर्गत भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या मंडळाच्यावतीने १५ दिवसीय बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये तालुक्यातील आजुबाजूच्या परिसरातील जवळपास १0 ते १६ वर्ष वयोगटातील असे ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.या १५ दिवसवीय आयोजित शिबिरामध्ये सहभागी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक गुरूचार्य यांनी प्रात: स्मरण, सामुदायीक ध्यान, साष्टांग प्रार्थना, ग्रामसफाई, रामधून, श्रमदान, राष्ट्रवंदना, महापुरूषांचे चरित्र दर्शन, स्वालंबन सेवा, शिस्त त्याग, निर्व्यसन, अनिष्ट रूढी उच्चाटन, शेतीविषयक तसेच व्यायाम जसे लाठी काठी, लेझीम, योगासने, सूर्यनमस्कार, ज्युडो कराटे, कवायत, भजन संगीत, भजन, टाळ, खंजरी, तबला, हार्माेनियम, भाषण, प्रवचन, किर्तन, प्रथोपचार ज्यात पासंगिक, प्रथोमपचार माहिती आयुर्वेद व निसर्गाेपचार आणि प्रचार श्री गुरूदेव सेवा मंडळ तत्वज्ञान, ग्रामगिता वाचन, प्रचार आदी विषयांबाबत मार्गदर्शन करून त्यांचेकडून ते अंगिकृत करून घेण्यात आले. आयोजित १५ दिवसीय शिबिरामध्ये ज्या ज्या मुलांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करीत गुरूवर्याच्या विविध विषयाच्या परीक्षेत पास झालेत अशांना आयोजकांकडून प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ग्रामगिता, प्रमाणपत्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेसह असलेली ट्रॉफी देवून त्यांचे कौतूक करण्यात आले.  कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधले. संचालन मनोहर वडीचार यांनी तर आभार लांजेवार यांनी मानले. शिबिरासाठी गुरूदेव सेवा मंडळ भंडारा, गोंदिया जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प.पू. अण्णाजी महाराज आश्रम नरसिंह टेकडी माडगी व मानवाधिकार कल्याण समिती जि. भंडाराच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.  (शहर प्रतिनिधी)