पोलीस भरती : प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरजचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत अनेक उमेदवार वंचित झाले आहेत. आवश्यक दस्तऐवज उपलब्ध करण्याची पूर्वसूचना या उमेदवारांना देण्यात आली नाही. यामुळे या उमेदवारांना अतिरिक्त भुर्दंड सोसत माघारी परतावे लागले आहे.सध्या भंडारा जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यात भरती प्रक्रिया वादात सापडल्यानंतर उमेदवारांना शिथिलता देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या मैदानात आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत प्रथम सहभाग घेतलेल्या उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली आहे. महिला उमेदवारांना त्रास सहन करावा लागला आहे. पोलीस भरती प्रक्रिया राबविताना आॅनलाईन अर्ज मागविण्यात आली आहे. या अर्जात उमेदवारांनी शैक्षणिक तथा शारीरिक माहिती सादर केली आहे. दरम्यान १२वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराचे मूळ दस्तऐवज अन्य शिक्षण संस्थेत असल्याने हे दस्तऐवज उपलब्ध करु शकले नाही. पोलीस कार्यालयातून भरती प्रक्रियेत भ्रमणध्वनीवरुन सांगण्यात आले. प्रथमत: पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेणारे उमेदवार मुळ दस्तऐवजाचे झेराक्स प्रत सोबतीला घेऊन मैदानात हजर झाले. महिला उमेदवारांना भ्रमणध्वनीवरुन माहिती देताना मूळ दस्तऐवजाची जुळवाजुळव सांगण्यात आली नाही. भ्रमणध्वनीवरुन साधी सूचना देण्याचे सौजन्य पोलीस विभागामार्फत दाखविण्यात आली नाही. महिला उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली आहे. दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. यात मूळ दस्तऐवज उपलब्ध नसलेल्या महिला उमेदवारांना परत पाठविण्यात आले आहे.पोलीस विभाग मार्फत मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात आला नाही असे दिसून आले आहे. उमेदवारांना भ्रमणध्वनीवरुन भरती प्रक्रियेत सहभाग घेण्याची सूचना देताना या बाबी सांगितल्या पाहिजेत. यामुळे कुणी भरती प्रक्रियेत सहभाग न घेता माघारी परतणार नाही. दरम्यान गेल्या वर्षात नागपुरात घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत मुळ दस्तऐवजाच्या झेरॉक्स प्रतच्या आधारावर महिला उमेदवारांना सहभाग देण्यात आले होते. याशिवाय तीन दिवसात संबंधित दस्तऐवज उपलब्ध करण्याचे सांगण्यात आले होते.या प्रक्रियेमुळे उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. परंतु भंडारा जिल्ह्यात मात्र उमेदवारांची अडचण तथा सहभाग घेणाऱ्या प्रक्रियेत शिथिलता देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. मूळ दस्तऐवज उपलब्ध नसल्याने महिला उमेदवारांना माघारी पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)
कागदपत्रांअभावी माघारी परतले उमेदवार
By admin | Updated: June 25, 2014 23:36 IST