शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

कालव्याचे अस्तरीकरण उखडले

By admin | Updated: October 30, 2015 00:44 IST

खापा-काटेबाम्हणी शिवारात आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प कालव्याच्या दोन्ही लाईनिंगस फुटलेल्या आहेत.

निकृष्ट बांधकामाचा पुरावा: बावनथडी प्रकल्पांतर्गत उपक्रमाचा भागमोहन भोयर तुमसर खापा-काटेबाम्हणी शिवारात आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प कालव्याच्या दोन्ही लाईनिंगस फुटलेल्या आहेत. त्यामुळे कालवाच वाहून जातो की काय? असे चित्र दिसत आहे. प्रकल्पाच्या कालव्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल. या कालव्याचे बांधकाम सहा वर्षापूर्वी झाले होते. यापूर्वी वरिष्ठ अधिकारी तथा चौकशी समितींनी पाहणी केली, परंतु अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही.तुमसर, मोहाडी आणि भंडारा तालुक्यातील कायमस्वरुपी सिंचन व्यवस्थेसाठी सितेकसा येथे बावनथडी प्रकल्प बांधण्यात आला. सन २०१७ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. तुमसर-रामटेक महामार्गापासून हाकेच्या अंतरावर बावनथडी प्रकल्पाचा मुख्य कालवा तयार करण्यात आला. पाच वर्षापूर्वी या कालव्याची लाईनिंगची कामे करण्यात आली होती. सन २०१२ मध्ये प्रकल्पात पाणी साठवणूक करण्यात आले होते. सन २०१३ मध्ये प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले त्यात अस्तरीकरण पाण्यात वाहून गेले. परिणामी या कालव्याला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. खापा-काटेबाम्हणी शिवारात लाईनिंग फुटलेली असून खोल खड्डे पडले आहे. कालव्यात कुठे मोठे दगड घातलेले दिसतात. सध्या प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता सोडले जात आहे. त्यामुळे कालवाच पाण्यात वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. या प्रकल्प बांधकामात अनियमितता झाल्याची चर्चा राज्यात आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी तथा समितींची नियुक्ती राज्य शासनाने केली होती. आता प्रकल्प पुर्णत्वाचा ध्यास राज्य शासनाने घेतला आहे. केवळ पाच वर्षात लाईनिंग उखडली जात असेल तर त्या बांधकामाचा दर्जा कसा असेल यावरून दिसते. राज्य शासनाने प्रकल्प पाहणीकरिता नियुक्त केलेल्या अंदाज समितीने मागील महिन्यात पाहणी केली. त्याचा अहवाल हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. या अधिवेशनात हा मुद्दा गाजणार की दबणार हे काळच सांगेल.