शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

वरठीत तरुणाचा निर्घृण खून

By admin | Updated: July 15, 2014 23:59 IST

उधारीचे पैसे मागितले, या कारणावरुन पाच जणांनी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास स्थानिक गांधी वॉर्ड येथे घडली. यातील पाचही आरोपी फरार

आरोपी सराईत गुन्हेगार : पैशाच्या वादातून घडला प्रकारवरठी : उधारीचे पैसे मागितले, या कारणावरुन पाच जणांनी एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केला. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास स्थानिक गांधी वॉर्ड येथे घडली. यातील पाचही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. विजय अंकालू कोलीयारे (२१) असे मृतकाचे नाव असून मंगेश वासनिक, सोनू वासनिक, राजेश वासनिक, शैलेश भोवते व रवी कांबळे ही फरार आरोपींची नावे आहेत. मृतक विजय हा छत्तीसगड राज्यातील असून मागील अनेक वर्षांपासून त्याचे वडिल गांधी वॉर्डात राहत आहेत. विजयने मंगेश वासनिक याला पैसे उधारीवर दिले होते. विजय व मंगेश यांच्यात काही दिवसांपासून पैसे मागण्याच्या कारणावरून वाद सुरु होता. घटनेच्या रात्री विजय व मंगेश यांच्यात दुपारपासून वाद सुरु झाला. अनेकदा झालेले भांडण इतरांच्या मध्यस्थीने मिटायचे व पुन्हा भांडण व्हायचे हा नेहमीचा प्रकार होता.सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास विजय व त्याचा मित्र विकास मेश्राम हा मंगेश वासनिक यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले. त्यावेळी कशाचे पैसे म्हणून त्यांच्यात भांडण झाले. मंगेशने सोनू वासनिक, राजेश वासनिक, शैलेश भोवते व रवी कांबळे यांना बोलावले व विजय कोलीयारे याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यावेळी विजयचा मित्र विकास मेश्रामलाही बेदम मारहाण केली. त्यानंतर ते पाचही आरोपी फरार झाले. घटनेची माहिती विजयच्या कुटुंबांना मिळताच त्यांनी विजयला रुग्णालयात हलविले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रात्रीपासून घटनास्थळावर तगडा पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस अधीक्षक कैलाश कणसे, पोलीस निरीक्षक मारूती शेंडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक वाकडे हे प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. वरठी पोलीस चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम गभणे, इलमकर, महादेव वंजारी हे आरोपीच्या शोधात पथके रवाना केले आहेत. मृतक विजयचा भाऊ देवानंद कोलीयारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध भादंवि ३०२, १४३, १४७, १४८, १४९ व ४/२५ कलमान्वये गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)