आपादग्रस्तांना धान्याचे वाटप : १७४ कुटुंब आली रस्त्यावर मोहाडी : तलाव फुटून गावात पाणी शिरले. नशिब सगळ्यांना गावात पाणी शिरल्याचे कळले. घर पडली. उध्वस्त घरातील कुटुंब रस्त्यावर आली. उध्वस्त घराची व राहत्या निवासाची वेदना सहन करीत सिंदपुरी गावातील परिवार दिवस काढत आहेत. अशातच कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर मोहाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबांच्या वेदनेवर मदतीची फुंकर घातली. सिंदपुरी गावातील १७४ कुटुंब रस्त्यावर आली आहेत. मालगुजारी तलावाची पार फुटून पाणी गावात शिरला. या पाण्याने मातीचे असणारी घरे उध्वस्त झाली. बऱ्याच कुटुंबांना घर सोडून गावातील समाज मंदिराचा आसरा घ्यावा लागला आहे. आठवड्याभरात ही १७४ कुटुंब बेघर झाली. धान्य पाण्याखाली आले. गावात एकच विषय शासन साथ देणार काय? शासनाच्या मदतीची वाट न बघत कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर मोहाडींनी त्या बेघर कुटुंबांना धान्य स्वरुपाची व किराणा वस्तूंचे वाटप करून सहकार्य केले. प्रत्येक कुटुंबाला प्रती २५ कि.ग्रॅ. तांदूळ व तिखट, हळद या स्वयंपाकाला लागणाऱ्या साहित्याचे वाटप ग्रामपंचायतच्या आवारात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती राजकुमार माटे, सरपंच योगीता पारधी, उपसरपंच देवानंद वासनिक, संचालक किरण अतकरी, सुनिल गिरीपुंजे, युवराज आगाशे, अशोक पटले, विणा धुर्वे, सचिव राजकुमार गोसेवाडे, अनिल भोयर, महेंद्र चौरीवार, आशिष चौरे, अविनाश दुपारे, भोजराम हारगुळे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वामन सिंगनजुडे, उषा उपरीकार, पुष्पलता सिंगनजुडे, बाया तिमुळे, सहादेव बोरकर, हंसराज वघरे, धनेंद्र तुरकर, जितू तुरकर, गनीराम बांडेबुचे, सहसराम नगरधने, धनराज वैद्य, जोतीराम सारंगपुरे, कलाम शेख, मोतीलाल ठवकर आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
त्यांच्या वेदनेवर बाजार समितीच्या मदतीची फुंकर
By admin | Updated: August 3, 2014 23:10 IST