शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा : १९४२ चे चलेजाव आंदोलन

By admin | Updated: August 9, 2015 00:57 IST

स्वातंत्र्याच्या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील अनेक वीरपुत्रांना हौतात्म्य आले. १९४२ च्या चलेजाव ...

भंडारा : स्वातंत्र्याच्या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील अनेक वीरपुत्रांना हौतात्म्य आले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनादरम्यान तुमसर व भंडारा येथे गोळीबार झाला. त्यामध्ये तुमसरचे सहा जणांना वीरमरण आले. त्यात १३० जखमी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व माकडे गुरुजी, नत्थू चौधरी, कर्मवीर बापू पाठक, दामले गुरुजी, बुधराम देशमुख, नारायण कारेमोरे, नारबाजी पाटील, भिवाजी लांजेवार, सदाशिव किटे, कृष्णाबाई वैद्य, सुमित्राबाई ठाकूर, बाळाजी पहलवान, महादेव लेंडे, किसन भस्मे, पांडुरंग कुंभलकर, वासुदेव कोंडेवार, वा.गो. कुळकर्णी, प्रभाकर पेंढारकर, आनंदराव चकोले, हरिश्चंद्र भोले, सीताराम कारेमोरे यांनी केले होते.सन १९४२ च्या स्वतंत्रता आंदोलनात भटू रामाजी लोंदासे, श्रीहरी काशिनाथ फाये (करडी), पांडुरंग परसराम सोनवाने, भुवाजी बालाजी भानोरे, राजाराम पैकुजी धुर्वे (भंडारा) हे शहीद झाले. उपस्थित लोकांनी शोकमग्न वातावरणात अंत्ययात्रा काढून डोंगरला नाला येथे येवून अग्नी देताना ‘भारत माता की जय’ च्या जल्लोषात घोषणा दिल्या. तो नागपंचमीचा दिवस होता. त्यावेळी पोलिसांनी अनेक घरांची झडती घेतली. दरम्यान भो.म. लांजेवार यांच्या निवासस्थानी बुलेटीन व पत्र मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. दामले गुरुजी, नारायण कारेमोरे, सदाशिव किटे, वासुदेव कोंडेवार, नारबाजी पाटील, वा.गो. कुळकर्णी यांना ताब्यात घेऊन भंडारा व जबलपूर येथील तुरुंगात पाठविण्यात आले.मोहाडी येथे नियमित प्रभातफेरी व ध्वज वंदन कार्यात पुनाजी वनवे, नामदेव भुरे, देवनाथ निमजे, किसन गोपाल डागा, सुरजरतन डागा, तेजराम गुरुनाथ श्रीपाद अग्रेसर होते. लक्ष्मणराव घोटकर हे सेनेत दाखल झाले होते. आंदोलनादरम्यान ते जापान येथे कैदी असताना ‘आझाद हिंद फौज’मध्ये भरती झाले. तुमसर, येरली, आंधळगाव, सिहोरा, मोहाडी, देव्हाडी, मोहगाव, वडेगाव, सुकळी, मुंढरी आदी गावातून २०० लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर दंड आकारण्यात आला. भंडारा येथील कारागृह अपूर्ण पडल्याने आंदोलनकर्त्यांना जबलपूर, रायपूर येथील कारागृहात पाठविण्यात आले. देव्हाडी येथे ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान आठवडी बाजारात आयोजित सभेत रामचंद्र फाये व पन्नालाल यांनी मार्गदर्शन केले. रेल्वे स्थानक जाळण्याचे निश्चित केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.भंडारा येथे झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ शहीद मैदान येथे आयोजित सभेत बाबा जोशी यांच्या भाषणामुळे देशभावना जागृत झाली. आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व गोळीबार केला. त्यामध्ये महादेव गणबा गजापुरे, गोपाल गणपत चुटके व झिटोबा गोसावी हे शहीद झाले. काही जखमी झाले. मन्रो हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी ध्वज हातात घेऊन निषेध मोर्चा काढला. पोलिसांनी नगर परिषदेची कचरा गाडी आणून पार्थिव उचलले. तेव्हा शेंदुर्णीकर यांनी पोलिसांशी वाद घालून मृतदेह ताब्यात घेऊन सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. बाबा जोशी, प्रभावती जकातदार, मुनीश्वर शास्त्री यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांमध्ये हर्देनिया बंधू, नंदलाल पशिने, भैय्या जोशी, भैय्या बोहटे, वसंत पवार, बाळ टेंभेकर, सूरजलाल साव, नंदकिशोर मिश्रा, गोकुळप्रसाद मिश्रा व तिवारी बंधू यांनी भाग घेतला. या घटनेत २० लोकांना ताब्यात घेण्यात आले. अड्याळ, पवनी या परिसरात नारायण बालाजी देशकर यांच्या अध्यक्षतेखाली कमेटी स्थापन करण्यात आली.