शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

आंबेडकरी विचारांना जातवर्गच्या सीमारेषा नाहीत

By admin | Updated: July 3, 2016 00:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल मानव जातीचे प्रेरणादाते होते. त्यांच्या समाजक्रांती विचाराला कुठल्याही जात वर्ग समुहाच्या सीमारेषा नाहीत.

नंदपुरे यांचे प्रतिपादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय आणि राष्ट्रवाद व्याख्यानभंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अखिल मानव जातीचे प्रेरणादाते होते. त्यांच्या समाजक्रांती विचाराला कुठल्याही जात वर्ग समुहाच्या सीमारेषा नाहीत. बाबासाहेब हे येणाऱ्या अनेक पिढ्यांचेही 'आयकॉन' आदर्श ठरणार आहेत, असे प्रतिपादन साहित्य संशोधक डॉ. ईश्वर नंदपुरे यांनी केले.विदर्भ साहित्य संघ शाखा भंडारा आणि सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय आणि राष्ट्रवाद या विषयावरील व्याख्यानात डॉ. ईश्वर नंदपुरे बोलत होते. अस्मितादर्श कार डॉ. गंगाधर पानतावने यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराचंद ठवकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कादंबरीकार अ.शी. रंगारी तसेच विसासंचे अध्यक्ष डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, प्रदीप गादेवार आणि नंदपुरे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. यावेळी डॉ. ईश्वर नंदपुरे यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. अतिथी अ.शि. रंगारी यांनी अस्मितादर्श प्रैमासिकाच्या प्रदीर्घ वाटचालीचा मागोवा घेतला. डॉ. नंदपुरे आपल्या भाषणात म्हणाले आंबेडकरी समाज ही संकल्पना विशिष्ट जातीपुरती मर्यादित नसून ती संकल्पना बहुजन समाजाच्या सर्वस्तरापर्यंत विस्तृत केली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे यांनी तर संचालन हर्षल मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रमोदकुमार अणेराव यांनी केले. कार्यक्रमासाठी विदर्भ साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय या संस्थांच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)