शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

शेती, वनजमिनीवर मॉईलचे ‘डम्पिंग यार्ड’

By admin | Updated: April 12, 2015 01:08 IST

मॉईल प्रशासन अवैध मॅग्नीज डम्पींग आदिवासींच्या शेतजमिनीवर करीत आहे.

तुमसर : मॉईल प्रशासन अवैध मॅग्नीज डम्पींग आदिवासींच्या शेतजमिनीवर करीत आहे. डोंगरी बु. मॅग्नीज खाणीतून मागील अनेक वर्षापासून मॅग्नीज काढणे सुरु आहे. आदिवासी तथा वनविभागाच्या जमिनीवर मॉईल प्रशासनाने नियमबाह्य डम्पींग यार्ड तयार केले आहे. पर्यावरण नियमांना मुठमाती देण्यात आली आहे. दरवर्षी डम्पींग क्षेत्र वाढत आहे.बाळापूर साझा डोंगरी बु. येथील आदिवासी शेतकरी तुकाराम उईके सर्व्हे क्रमांक ६५/२, धर्मराज तुकाराम उईके सर्व्हे क्रमांक ६७ दोघांची आराजी १.५२ हे.आर. मध्ये विना परवानगीने तथा मोबदला न देता बळजबरीने शेतात डम्पींग करणे सुरु आहे. शेतमालकांनी मॉईल प्रशासनाला याची तक्रार केली. परंतु तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आली. सध्या या शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.बाळापूर गट क्रमांक १०९ मध्ये वनविभागाच्या जमिनीवर १४ हेक्टर आर.मध्ये एच.आय.एम.एस. प्लांट (मॅग्नीज सार्टींग) तयार केला आहे. यात अवैध डम्प तयार केला. संबंधित विभागाची येथे अनुमती घेतली नाही. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या डम्पमुळे कुंभरे यांच्या शेतात पाणी येत आहे. ज्यामुळे पिकांना धोका निर्माण झाले आहे. तक्रार केल्यावर केवळ मॉईल प्रशासन होकाराचे गाजर दाखविते. या प्रकरणाची चौकशी करावी याकरिता शेतकऱ्यांचे प्रतिनिधीमंडळ केंद्रीय सतर्कता विभाग तथा डी.जी.एफ. (निर्माण भवन), दिल्ली येथे जाणार आहे.डोंगरी बु. येथील शेतकरी नानाजी राहांगडाले, मंगरू राहांगडाले, उर्मिला रामचंद्र पटले यांच्या शेतातील मागील २५ वर्षापासून मॉईल प्रशासन मॅग्नीजचे उत्खनन करीत आहे. याकरिता मॅग्नीजचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. डोंगरी बु. येथील गट क्रमांक १८७ मध्ये १.७५ एका शेतीत शेतकरी आपली उपजिविका करीत होते. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्याचे खासदार व आमदार यांना मॉईल प्रशासन खोटी माहिती देवून दिशाभूल करतात. या सर्व प्रकरणाची माहिती केंद्रीय सतर्कता विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी दिली. मॉईल प्रकरणाची चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येते. डोंगरी बु. व चिखला येथे मॉईलच्या खाणी आहेत. या खाणीचे क्षेत्र कुठून कुठपर्यंत आहे याची माहिती वनविभाग तथा महसूल प्रशासनालाही नाही. डोंगरी बु. कुरपुडा रस्त्याच्या शेजारी मॉईल वेस्टेज मटेरियलचे उंच ढिगारे तयार झाले आहेत. कुरमुडा गावातील नागरिकांना बाराही महिने सर्दी खोकल्याचा त्रास आहे. परिसरातील गावातील नागरिकांना श्वसनाचा त्रास आहे. पिण्याचे पाणी आरोग्यास अपायकारक झाले आहे. हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचला आहे. दरवर्षी केंद्र शासनाच्या भूगर्भ विभाग, पर्यावरण तथा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे भेट देण्याचा नियम आहे. येथे केवळ कागदावर भेट दिली जाते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे भेट देण्याचा नियम आहे. येथे केवळ कागदावर भेट दिली जाते. वनविभागाच्या जमिनीवर मॉईलने अतिक्रमण केले तरी संबंधित विभाग मूळ गिळून गप्प आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडे आदिवासी बांधवांच्या संघटना न्याय मागणार असल्याचेही जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी लोकमतला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)