शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

५१८ बालके कुपोषणाच्या विळख्यात

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

जिल्ह्यातील १,१९६ अंगणवाडी केंद्रातून ८७ हजार ८३८ बालके शिक्षण व जीवनाचे प्राथमिक शिक्षण घेत आहेत.

प्रशांत देसाई भंडाराजिल्ह्यातील १,१९६ अंगणवाडी केंद्रातून ८७ हजार ८३८ बालके शिक्षण व जीवनाचे प्राथमिक शिक्षण घेत आहेत. यापैकी ५१८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ही बालके कुपोषणाच्या विळख्यात असले तरी महिला व बाल विकास विभागाकडून ‘आॅल ईज वेल’ असल्याचे सांगितले जात आहे.मागील तीन दशकाहून अधिक काळापासून राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे मुलांच्या विकासात लक्षणीय सुधारणा झाली, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण पोषण आहार पद्धतीमध्ये व्यापक बदल होणे गरजेचे आहे. भंडारा जिल्ह्यात १,१९६ अंगणवाडी तर १०९ मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. १,१९० सेविका व १,१७१ मदतनिसांच्या माध्यमातून या अंगणवाडी केंद्रांवरील बालकांचे पालन पोषण तथा त्यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जात आहे. जून महिन्याच्या शेवटी बालविकास प्रकल्प विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार महिला व बाल विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात शुन्य ते ६ वर्षे वजन गटातील बालकांची संख्या ८७ हजार ८३८ असल्याची नोंद आहे. यातील वयानुसार वजन केलेल्या कुपोषणासंदर्भातील नोंद झालेल्या तीव्र कमी वजन गटात मोडणारी ५१८ बालके आहेत. साधारण श्रेणीत ८३ हजार ८४९ बालकांचा समावेश आहे. कमी वजन गटातील बालकांची संख्या ३ हजार ४७१ ईतकी आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिकयात सर्वाधिक तीव्र कमी वजनाच्या क्षेणीतील बालके ही पवनी तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिक १०२ बालकांचा कुपोषणाच्या श्रेणीत समावेश आहे. त्याखालोखाल लाखनी तालुक्यात ९८ बालके तर सर्वात कमी ४१ बालके साकोली तालुक्यात आहे. ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्प क्षेत्रामधील अंगणवाडीतील ६ महिने व ३ वर्षे वयोगटातील लाभार्थी, गरोदर व स्तनदामाता, तीव्र कमी वजनाची बालके यांना घरपोच आहार पुरविला जाते. आहारात गहु, गुळ, सोयाबीन, शेंगदाणे आदींचा समावेश आहे. अर्भक व बालकांच्या पोषण पद्धतीत बदल करणे, आहारात विविधता आणणे, उपलब्ध अन्न पदार्थांचा योग्य वापर करणे, सुक्ष्म पोषक तत्वांचा आहार रासायनिक पध्दतीने समृद्धीकरण करणे, आरोग्याच्या दृष्टिने वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता लसीकरण याबाबत जनजागृती करणे या मुद्यांवर भर देणे गरजेचे झाले आहे.बालविकास प्रकल्पांच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांचे नियमित वजन केले जाते. ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना घरपोच आहार दिला जातो. अन्य जिल्ह्याच्या तुलनेत भंडाऱ्याची संख्या कमी असून भंडारा जिल्हा कुपोषणच्या विळख्यात नाही. हा जिल्हा कुपोषण मुक्तीकडे वाटचाल करीत आहे.- पी.जे. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), जिल्हा परिषद, भंडारा.तालुकानिहाय बालके व कमी वजनगटातील बालकेतालुका  एकुण बालक साधारण   कमी वजन   तीवभंडारा      १५,३१८       १४,५०३      ७४२      ७३मोहाडी     १३,४३९      १३,१५१      २४४      ४४ तुमसर     १५,४६३      १४,७९७      ६००      ६६ लाखनी    १०,७०९       १०,२७०      ३३८      ९८ साकोली    ११,६७६       ११,४८८      १४७      ४१ पवनी      १०,८०४      ९,८७६      ८२६      १०२ लाखांदूर  १०,४३२      ९,७६४      ५७४      ९४ एकूण      ८७,८३८     ८३,८४९    ३,४७१    ५१८