एकाला अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईभंडारा : अवैधरित्या मोहफुलाची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका चारचाकी वाहनाला पकडले. यात २ लक्ष ८५ हजार २०० रुपयांचे मोहफूल जप्त करण्यात आले असून योगेश धनराम कोटेकार रा. महेकेपार (जि. बालाघाट) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नववर्षाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भंडारा येथील अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीच्या आधारावर आंतरराज्य मार्ग असलेल्या पवारसाखळी ते पिपरा मार्गावर मरारसाखळी गावाजवळ उपरोक्त कारवाई करण्यात आली. यात चारचाकी वाहन एम एच ३१ ए एच २४४७ ला ताब्यात घेवून योगेश कोटेकार याला अटक करण्यात आली. यावेळी वाहनातून मोहफुलाचा एकूण २२ कोटी जप्त करण्यात आल्या. मोहफुलाचे अंदाजे वजन ८८० किलो असून त्याची किंमत २ लक्ष ८५ हजार रुपये सांगण्यात येते. अटक करण्यात आलेल्या इसमाला तुमसर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईत अधीक्षक नितीन धार्मिक, तुमसर येथील दुय्यम निरीक्षक एन. एस. घुरड, साकोलीचे आर. आर. उरकुडे, कर्मचारी व्हि. जे. माटे, एन. जी. कांबळे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
२.८५ लाखांचे मोहफूल जप्त
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST