शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

२५५ शेतकरी विधवांची फरफट सुरुच

By admin | Updated: December 5, 2015 00:33 IST

धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराधानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे. परिणामी, धानाची शेती बेभरवशाची झाली आहे. सततच्या नापिकीमुळे व वाढत्या कर्जामुळे जिल्ह्यात ४०४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यापैकी २५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर जिल्हा प्रशासनाने अपात्रतेचा ठपका ठेवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. विधवांचे कुंकू हरपले तरीही शासनाकडून बळीराजाची फरफट सुरूच आहे़सन २००३ पासून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाले. ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत भंडारा जिल्ह्यात ४०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ त्यापैकी जिल्हा प्रशासनाने केवळ १४१ आत्महत्यांची प्रकरणे पात्र ठरविले़ २५५ शेतकऱ्यांना मदतीपासून अपात्र ठरविण्यात आले़ यातील आठ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत़ पात्र १४१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी ३८ लाखांची मदत करण्यात आली़ मागील १३ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, शासनाने २५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर अपात्रतेचा ठपका ठेवला आहे़ परिणामी, मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबियांना मिळणाऱ्या सोई-सवलती प्राप्त होण्यास मोठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे शेतकरी हिताच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे त्यांच्याच जिवावर उठायचे असा हा खेळ आहे़ यावर्षी धानाचे उत्पादन जोमात असताना किडीचा प्रादूर्भाव, वातावरणात बदल यामुळे धानाचा उतारा कमी झाला़ एकरी १५ क्विंटल धान्य व्हायला पाहिजे. परंतु यावर्षी एकरी दोन क्विंटलपेक्षा कमी धान झाले. अ दर्जाच्या धानाला १,४६० रुपये, ब दर्जाच्या धानाला १,४१० रुपये, प्रति क्विंटल दर शासन देत आहे. समर्थन मुल्य १,४१० रुपयांप्रमाणे दोन क्विंटलचे २,८२० रुपये होतात. धान लागवडीसाठी एकरी १७ ते २० हजार रुपयांचा खर्च येतो. खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरात काहीएक उरत नाही. उलट मेहनतीचा खर्च व्यर्थ ठरतो. एकंदरीत घडाईपेक्षा मडाईतच शेतकरी होरपळला आहे.एकंदरित शासनाकडून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची होरपळ सुुरु आहे. नुकसानीपोटी केवळ पॅकेजची घोषणा केली जाते. हातात काहीही उरत नाही, हे वास्तव आहे. जगाच्या पोशिंद्याला मानाने जगता यावे, यासाठी भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, धानाला पाच हजार रुपये हमीभाव, शेतकऱ्यांना रोजगार हमीचे मजूर उपलब्ध करुन देणे, रासायनिक खते व किटकनाशके सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणे, आदी सोयी करणे गरजेचे आहे. परंतु, दुर्दैवाने यापैकी काहीच होत नाही. अधिवेशनाच्या तोंडावर केवळ राजकारण सुरु आहे. उपाययोजना मात्र थंडबस्त्यात आहेत.यावर्षी ४६ पैकी २० प्रकरणे अपात्रयावर्षी भंडारा जिल्ह्यात एकूण ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ यापैकी जिल्हा प्रशासनाने केवळ १८ शेतकऱ्याची आत्महत्या पात्र, तर २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अपात्र आहेत, असा अहवाल देण्यात आला़ आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणे तालुका स्तरावर प्रलंबित आहेत़ यातील सर्वाधिक ११ आत्महत्या लाखनी तालुक्यात आहेत़ प्रत्येकी ०३ आत्महत्या मोहाडी व तुमसर तालुक्यात, पवनी ०७, साकोली ०८, लाखांदूर तालुक्यात १०, भंडारा तालुक्यात ०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत़