शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

देव, ऋषिमुनी, साधू 'मृत' हरणाचे, वाघाचे कातडे का वापरत, त्यामागे होते विशेष कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:09 IST

प्राणी मेल्यानंतरसुद्धा त्यांचे गुणधर्म त्याच्या शारीरिक घटकात म्हणजे कातडे, अस्थि, केस यामध्येही राहिलेले असतात. 

देवी देवतांकडे कधीही पहा, त्या प्रसन्न दिसतात. त्यांना पाहून आपल्यालाही प्रसन्न वाटते. म्हणून आपण देवदर्शन घेण्यासाठी मंदिरात जातो. देवाचे नखशिखांत रूप न्याहाळतो. ते न्याहळत असताना देवाचे वस्त्र आपले लक्ष वेधून घेते. 

सरस्वतीचे शुभ्र वस्त्र, राम-सीतेची वल्कले, विष्णूंचे पितांबर, दत्तात्रेयांचे मृगाजिन, महादेवाचे व्याघ्राजिन, जगदंबेची खणाची साडी, गणरायाचे सोवळे, पांडुरंगाचे-बालाजीचे शुभ्र धोतर आपल्या लक्षात राहते. बाकीचे वस्त्रप्रकार आपणही वापरतो. पैकी मृगाजिन, व्याघ्राजिन हे वस्त्रप्रकार मात्र दत्त, महादेव वगळता साधू-संत, ऋषीमुनी वापरत असल्याचे आपण पाहिले आहे. यामागे कारण काय ते जाणून घेऊ. 

व्याघ्राजिन म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते-व्याघ्रजिन म्हणजे वाघाच्या कातड्याचे वस्त्र. व्याघ्राजिनावर बसण्याने मूळव्याध, भगेंद्र, अंडवृद्धी यासारखे विकार होत नाहीत. झालेलेही नष्ट होतात. तसेच व्याघ्राजिनाजवळ सर्प, विंचू, किडेकाटे विषारी जीवजंतु येत नाहीत. त्यामुळे त्यांचे भय रानावनात निर्जन प्रदेशातही व्याघ्राजिनावर बसून ध्यानधारणा करणाऱ्यांना राहत नाही. प्राणी मेल्यानंतरसुद्धा त्यांचे गुणधर्म त्याच्या शारीरिक घटकात म्हणजे कातडे, अस्थि, केस यामध्येही राहिलेले असतात.

मृगाजिन म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते-मृगाजिनावर बसल्यानेही मूळव्याध, भगेंद्र, अंडवृद्धि यासारखे रोग नष्ट होतात. मृग हा निसर्गत: शाकाहारी सत्ववृत्तीचा प्राणी आहे. म्हणूनच तपोवनातील तपस्वी आपल्या आश्रमात मृग पाळून त्यांचा सहवास स्वीकारत असत. हरणाजिनावर बसणाराचा कामविकार शमन पावतो. इतकेच काय, पण त्यावर सतत बसल्यास नपुंसकता येते. म्हणून, तपस्वी, वानप्रस्थी, संन्यासी त्यांचा सतत उपयोग करत असत. परंतु ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी तसे नपुंसक होऊ नये, म्हणून त्यांनी मृगाजिनावर दर्भासन घ्यावे, असे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. त्यायोगे कामशमन होते परंतु नपुंसकता येत नाही.

म्हणून देव, ऋषि मुनी मृगाजिन, व्याघ्राजिन परिधान करत किंवा त्याचे आसन बनवून त्यावर आसनस्थ होत तपश्चर्या करत असत.