शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

VIDEO: बिंदुसराच्या पात्राचे रूंदीकरण केल्याने टळला धोका

By admin | Updated: October 2, 2016 21:03 IST

१९८९ साली बीड शहराने पूराचा जबरदस्त तडाखा सहन केला होता. बिंदुसरा नदीच्या दोन्ही बाजुला असलेल्या संपूर्ण शहर जलमय झाले होते.

प्रताप नलावडे/ऑनलाइन लोकमत
 
बीड, दि. 2- १९८९ साली बीड शहराने पूराचा जबरदस्त तडाखा सहन केला होता. बिंदुसरा नदीच्या दोन्ही बाजुला असलेल्या संपूर्ण शहर जलमय झाले होते. अचानक घरात शिरलेल्या पाण्याने अनेकांचे संसार पाण्यावर तरंगले होते. पूराचा तडाखा इतका मोठा बसला होता की त्यावेळी ११६ लोक पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. नदीचे पात्र अरूंद असल्याने आणि पाण्याचा प्रवाह खूप मोठा असल्याने पाणी थेट घराघरात शिरले होते. 
 
यंदाही असाच तडाखा शहराला बसला असता मात्र, बिंदुसरा नदीच्या पात्राचे खोलीकरण आणि रूंदीकरणाचे काम योग्यवेळी पूर्ण झाल्याने अतिवृष्टी होऊन आणि बिंदुसराला पूर येऊनही बीड शहराला कसलाही धोका झाला नाही. नदीकाठच्या काही भागातील वस्तीत पाणी शिरले मात्र पूराच्या पाण्याने ८९ साली झालेल्या हाहाकाराची पुनरावृत्ती टळली.
 
याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी बीड नगरपालिकेचे गटनेते भारतभूषण क्षीरसागर आणि तत्कालीन नगराध्यक्षा दीपा क्षीरसागर यांनी २०१३ मध्ये नदीच्या पात्राचे रूंदीकरण आणि खोलीकरण करण्याचा निर्णय घेतला.नदीच्या पात्राचे रूंदीकरण आणि खोलकरण कशासाठी करायचे, असा सवाल उपस्थित करत त्यावेळी अनेकांनी या प्रस्तावाला विरोध केला. परंतु हा सगळा विरोध आणि बोचरी टीका सहन करत क्षीरसागर यांनी मंत्रालयात यासंदर्भातील प्रस्ताव दाखल केला आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.
 
त्यानंतर सुमारे चार किलोमिटर इतके नदीपात्राचे रूंदीकरण आणि खोलीकरण पालिकेने यांत्रिकी विभागाच्या सकार्याने केले. आज बिंदुसराला पूर आल्यानंतरही शहरातील पूर रेषेत असलेल्या भागांना त्याचा फार मोठा फटका बसला नाही. खास बाग, खाव्जा नगर, मासुम कॉलनी, बुध्द पेठ, मोमीनपूरा, कुंभारवाडा, राजेगल्ली, जुना मोंढा, स्मशानभूमी परिसर, या भागाला पाण्याने वेढले होते. यावेळी मात्र पूर येऊनही या भागाला पूराच्या पाण्याचा धोका झाला नाही.