शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

VIDEO- चार वर्षांनंतर मानूर मठाला मिळाले मठाधिपती

By admin | Updated: August 17, 2016 22:29 IST

संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या मानूर येथील मठाला तब्बल पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नवे मठाधिपती मिळाले आहेत

ऑनलाइन लोकमतबीड, दि. 17 - संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मानूर येथील मठाला तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवे मठाधिपती मिळाले आहेत. राज्यातील शिवभक्तांचे मठाधिपतीच्या निवडीकडे लक्ष वेधले होते. नागेश विश्वनाथ पुराणिक या अवघ्या १९ वर्षांच्या नागेश विश्वनाथ पुराणिक यांनी आज हजारो शिवभक्तांच्या साक्षीने मठाचे उत्तराधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली. गुरू गिरी शिवाचार्य मानूरकर महाराज म्हणून त्यांचे नामकरणही भक्तांनी केले.हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी पहाटे ६ वा. मानूर (ता. शिरूर कासार) देवस्थानात पट्टाभिषेकास सुरूवात झाली. शिवाचार्य मांढकेर महराज यांच्या गुरू साक्षीने व शिवलिंग शिवाचार्य महराज बेळंकीकर यांच्या गुरूतत्वात हा अभिषेक पार पडला. यानंतर नागेश पुराणिक महराज यांची जय...शिवा...हर...हर... महादेवच्या जघोषात मानूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी किर्तन, प्रवचन व महिलांच्या डोक्यावरील कलशाने लक्ष वेधले होते. पट्टाभिषेकाचा विधी उरकल्यानंतर मंदिर परिसरातच शंखनादाने धर्मसभेला सुरवात झाली होती. यावेळी धर्मगुरू-शिवाचार्य, मानूर मठाचे शिष्य, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री. सुरेश धस, जयदत्त धस, जिल्हाध्यक्ष सचिन शहागडकर, संजय गिराम, तालुकाध्यक्ष प्रविण शेटे, उमाकांत शेटे, वैजिनाथ काळकर, शैलेश जगापूरे, प्रकाश स्वामी, संध्या तोछकर, अरूण लथे, रोहिदास पाटील, सरपंच विठ्ठल वनवे, संजय गाढवे यांच्यासह इतर जिल्ह्यातून व परराज्यातील वीरशैव समाजाचे भाविक उपस्थित होते. यावेळी शिवा संघटनेचे अध्यक्ष म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर मठाच्या विकासाला योग्य दिशा मिळणार आहे. गावकऱ्यांचे मतपरिवर्तन झाले ही मोठी बाब आहे. राज्यातील ३५० मठापैकी बीड जिल्ह्यात कपिलधार येथे मन्मथ स्वामी यांची समाधी असून मानूर येथे त्यांचेच गुरूगड असल्याने जिल्ह्याचे मोठे भाग्य आहे. गत पाचवर्षात विकास कामांना बसलेली खिळ आता मोडीत काढून कामाला लागायचे आहे. वीरशैव समाजांच्या तत्वांची अंमलबजावणी करून शिवा संघटना काम करीत आहे. येथील मठाकरिता गुरूवर्य परंडकर महराज व गुरू गिरी शिवाचार्य महराज यांचे मोठे योगदान राहिले आहे. आता विरपक्ष शिवाचार्य नागेश महराज यांच्या रुपाने मठाधिपती लाभले असून पुर्वजांची उणिव भासू देणार नाहीत. महराजांच्या प्रत्येक निर्णयामागे शिवा संघअना एक ढाल म्हणून कार्यरत राहणार असल्याचे यावेळी प्रा. धोंडे यांनी सांगून शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आ. जयदत्त क्षीरसागर यांनी मानूर मठाची महती सांगितली. न्यायालयाच्या निर्णयानंतर संपूर्ण वाद मिटल असून येथील मठाच्या गुरूघराची सबंध देशात चर्चा असल्याचे सांगितले. आता भाविक आणि  देवस्थानाचा धागा मजबूत करणे गरजेचे आहे. चांगली भावना ठेऊनच काम करण्याचा सुचक सल्ला त्यांनी दिला. तर माजी मंत्री सुरेश धस यांनी गत पाच वर्षात मठाची झालेली दुरवस्था मांडली. दरम्यानच्या घअना ह्या गैरसमजुतीमधून झाल्या होत्या. त्याबद्दल धस यांनी जाहिर माफी मागून पुन्हा मठाच्या विकासाबाबत आशा व्यक्त केली.यावेळी उपस्थित शिवाचार्य बेळंकीकर महराज, शिवाचार्य माढेकर महराज आदींनी मनोगत व्यक्त करून गुरूगिरी शिवाचार्य नागेश महराज यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. धर्मसभेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.