शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

जिल्हास्तरीय रेशीम शेती प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद. - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST

बीड :आत्मा कृषी विभाग बीड व वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये ...

बीड :आत्मा कृषी विभाग बीड व वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग वाढीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांकरिता एक दिवसीय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे यांनी शेतकऱ्यांना पोकरा प्रकल्पांतर्गत शेतकरी बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी करिता कृषी प्रक्रिया उद्योग स्थापने संदर्भात मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोकरा प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग उभारणीसाठी अर्ज दाखल करण्याचे आव्हान केले.

कृषी विद्यापीठाचे डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी तुतीच्या विविध जाती व रेशीम कीटक संगोपनाचा उत्पादन खर्च कमी करून दर्जा टिकविण्यासाठी या उद्योगासंबंधीचे विविध देश व पारंपरिक राज्यातील कौशल्य आत्मासात करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. डॉ. लटपटे म्हणाले, ‘रेशीम उद्योगात अळ्यांच्या कात टाकण्याच्या अवस्था व तुती लागवडीतील यांत्रिकीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. रेशीम उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्यामधील तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची माहिती नसल्याने उद्योगात अपयशी होणारांची संख्याही जास्त आहे. चॉकीमुळे कोष मिळण्याची शाश्वती वाढते. इतर पारंपरिक देशात खासकरून चीनमध्ये चॉकीच्या साहाय्याने कोष उत्पादन घेण्यावर भर असल्याने त्यांच्या यशाचा आलेख आपल्यापेक्षा सरस दिसतो याबाबत माहिती दिली.

रेशीम प्रक्रिया उद्योजक सचिन थोरात यांनी विपणन आणि प्रगतिशील शेतकरी संपत परळकर, सुदाम पवार यांनी स्वनुभव कथन केले.

जिल्हा रेशीम विकास अधिकारी व्ही एस पवार यांनी मराठवाडयातील विविध पीकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असून पीक पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. शेती किफायतीशीर करण्‍यासाठी शेतीपूरक व्‍यवसाय रेशीम उद्योग निश्चितच आर्थिक स्‍थर्य प्राप्‍त करून देऊ शकतो. कर्नाटक राज्‍यातील रामनगर येथील बाजारपेठेत रेशीम कोषास चांगला भाव मिळत असून, कोषाचे एखादे पिक गेले तरी वर्ष वाया जाण्‍याची भीती नाही. प्रत्‍येक शेतकऱ्याने दीड - दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड करून इतर पीकाच्या तुलनेत वर्षाकाठी रेशीम कोषाचे ६ ते ७ पीके घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. प्रकल्प विशेषज्ञ कृषी अतिष चाटे यांनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग उभारणीसाठी तांत्रिक बाबी व योजना समजावून सांगितल्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रकल्प सहायक अतिष चाटे, पी. डी. मुंडे, स्वप्निल कदम, गजानन तारळकर, जयशिव जगधने, राजकुमार मुंदडा, प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर, शेतीशाळा प्रशिक्षक केशव चाटे, पांडुरंग भंडारे, लेखा सहायक सुशील धावरे, रवी शिरसाट यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली.