मुकुंद आघाव : ‘माय अर्थ माय ड्युटी’ अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण हा माझा गौरव आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही मोहीम राष्ट्रीय छात्र सेना प्रभावीपणे जोपासत आहे, असे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी काढले.
योगेश्वरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या हस्ते ‘माय अर्थ माय ड्युटी’ अभियानांतर्गत कारगील शहीद परमवीरचक्र विजेते लेफ्टनंट मनोजकुमार पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आघाव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत पाटील हे होते. शहिदांच्या बलिदानाची एनसीसीने आठवण ठेवली. त्यांच्या स्मृती जपण्याची व त्यांच्या नावाने वृक्ष लागवड करण्याचा हा कार्यक्रम अत्यंत भावस्पर्शी आहे. या परिसरात एनसीसी विभागाने नंदनवन उभे केले आहे, असेही आघाव म्हणाले.
प्रास्ताविक प्रा.एस.पी.कुलकर्णी यांनी केले. संचालन नम्रता सरवदे यांनी केले. आभार शेख आहात यांनी मानले. यावेळी प्रा.एम.डी.चव्हाण, नगरसेवक सुनील व्यवहारे, रवींद्र वारकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष चौधरी, प्रकाश अकुस्कर, विकास कोरडे, सागर ढोबळे यांनी प्रयत्न केले.
060721\0139avinash mudegaonkar_img-20210706-wa0042_14.jpg