शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

घरी बसलेल्या गुरुजींना कामावर जाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 18:36 IST

५० टक्के उपस्थितीत शैक्षणिक कामांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना 

ठळक मुद्देअपंग, दुर्धर आजारग्रस्त आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे शिक्षक वगळलेशिक्षकांकडून ५० टक्के उपस्थितीत १५ शैक्षणिक कामे करून घेण्याबाबत निर्देश

बीड : कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद असल्याचा फायदा घेत शैक्षणिक कामे टाळून घरी बसणाऱ्या  गुरुजींना कामाला लागण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तसेच पुढील काळात हंगामी ऊसतोड कामगार पाल्यांचे स्थलांतर रोखणे, भोंगा शाळा, ऑनलाईन शिक्षण व तत्सम इतर शालेय कामकाजासाठी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. त्यानुसार अपंग, दुर्धर आजारग्रस्त आणि ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे वगळून शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के प्रमाणात राहील याबाबतची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड-१९ बाबत ज्या शिक्षकांना तालुका अथवा जिल्हास्तरावरून जबाबदारी देण्यात आली असेल, अशा शिक्षकांची स्वतंत्र यादी तयार करून जि. प. शिक्षण विभागात सादर करण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांकडून ५० टक्के उपस्थितीत १५ शैक्षणिक कामे करून घेण्याबाबत शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे.शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती व इतर पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत या कामांचा आढावा घेऊन अहवाल पाठविण्याबाबत शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी सूचित केले आहे.

शिक्षकांना करावी लागणार ही कामेहंगामी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणे, ऊस तोडणी कामगारांसोबत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांचे स्थलांतर रोखणे, भोंगा शाळेचे नियोजन करणे, आधार कार्ड अपडेट करणे, अभ्यासक्रमाबाबत कृती आराखडा तयार करणे, अध्ययन, अध्यापन निष्पत्तीवर प्रश्नपेढी निर्माण करणे, जिओग्राफिकल गट तयार करून स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणे, शालेय ग्रंथालय तसेच विद्यार्थी संचिका अद्ययावत करणे, शैक्षणिक साहित्य तयार करणे, शाळेत परसबाग निर्माण करणे, आरटीई २५ टक्के प्रवेश पूर्ण करणे, शालेय पोषण आहार अभिलेखे अद्ययावत करणे, आहार पुरवठा, सरल प्रणालीवर प्रलंबित ऑनलाईन कामे तसेच प्रिमॅट्रिक शिष्यवृत्तीची ऑनलाईन कामे पूर्ण करणे, ऊसतोड कामगारांसोबत जाणाऱ्या पाल्यांना हमीकार्ड वितरित करणे आदी कामे शिक्षकांकडून करून घेण्याबाबत सूचना आहेत.

तर नियंत्रण यंत्रणा जबाबदारदिलेल्या सूचनांची १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करावी. नियंत्रण यंत्रणेमार्फत शिक्षक उपस्थितीबाबत वेळोवेळी भेट देऊन खात्री करावी, कार्यवाही होत नसल्यास संबंधित मुख्याध्यापक व नजीकच्या नियंत्रण यंत्रणेला जबाबदार धरणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सूचित केले आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकBeedबीड