ॲड. पी.डी. मिश्रा यांनीही महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी कामाच्या ठिकाणी किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत महिलांची छेडछाड होणार नाही, याबाबतीत मी आणि आमचे पोलीस कटिबद्ध आहोत, अशी भावना व्यक्त केली. ॲड. सी.बी. हंगे यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा आणि महिला सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले. न्यायालयातील कर्मचारी साखरे यांनी महिलांना कशा प्रकारे भारतीय व्यवस्थेत स्थान आहे, याची प्रचिती म्हणजे आज आपण सगळे महिला आहोत, अशा विविध विषयांवर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला दिवाणी न्यायाधीश ज.तु. कोरेगावकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहदिवाणी न्या. प्रीतेश देशपांडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी.डी. मिश्रा, वकील संघाचे सचिव ॲड. मोहन भोसले, ॲड. नवनाथ पांचाळ, ॲड. पांडे, ॲड. ईके, ॲड. घुले, ॲड. साखरे, शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. मोहन भोसले यांनी केले. आभार प्रदर्शन ॲड. एम.बी. वाव्हळ यांनी केले. या वेळी वकील मंडळी, नागरिक, महिला उपस्थित होते.
===Photopath===
080321\img-20210308-wa0170_14.jpg