जिल्ह्यात रविवारी ६ हजार ५२९ जणांची चाचणी केली गेली. त्यांचे अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाले. यात, ८२४ नवे रुग्ण आढळले तर, ५ हजार ७०५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ५७, आष्टी १८२, बीड २०१, धारुर ४४, गेवराई ५४, केज ७८, माजलगाव ५१, परळी २१, पाटोदा ६५, शिरुर ४९ व वडवणी तालुक्यातील २२ जणांचा समावेश आहे. दरम्यान, मागील २४ तासात १६ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८२ हजार ४३ इतकी झाली असून, त्यापैकी ७४ हजार ४६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आतापर्यंत १८७७ जणांचा बळी गेला आहे. सध्या ५ हजार ६९९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीइओ अजित कुंभार, डीएचओ आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.
८६८ कोरोनामुक्त, ८२४ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST