शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जातीचा उंबरठा ओलांडणारी ११२ जोडपी 'कन्यादान'पासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST

बीड : मागास प्रवर्गातील गरीब मुला- मुलींच्या लग्नात आर्थिक मदत व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कन्यादान योजना व ...

बीड : मागास प्रवर्गातील गरीब मुला- मुलींच्या लग्नात आर्थिक मदत व्हावी, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कन्यादान योजना व आंतरजातीच विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन निधी दिला जातो. परंतु समाजकल्याणला मागील दोन महिन्यापासून शासनाकडून निधी न आल्याने जिल्ह्यातील ११२ जोडपे यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

लग्नसोहळ्यातील अनाठायी खर्चापायी कर्जबाजारी होणे व त्यातून वधुपित्याला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी व विवाहात होणारा अनावश्‍यक खर्च टाळण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या वरील प्रवर्गातील मुलींच्या लग्नासाठी समाजकल्याण विभागाकडून कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. सुरवातीला सोहळ्यात लग्न करणाऱ्या नवबौद्धांसह अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, धनगर, वंजारींसह भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबा २० हजार रूपये मदत केली जाते. तसेच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन म्हणून निधी दिला जातो. परंतु मागील दोन वर्षांपासून समाजकल्याणकडे ११२ प्रस्ताव पात्र असतानाही केवळ निधी नसल्याने त्यांना हे प्रोत्साहन निधी मिळाला नाही. केंद्र शासनाकडून २५ हजार रूपये समाजकल्याणला मिळाले असले तरी राज्य शासनाकडून अद्याप एकही रूपया मिळालेला नाही. त्यामुळे अर्धवट निधीही वितरित करता येत नसल्याचे सांगण्यात आले. याचा फटका आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने यावर लवकर कारवाई करून सर्व निधी वितरीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मदत काय मिळते?

१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५हजार रुपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५०हजार रुपयांचे अनुदान मिळते.

यांना मिळतो लाभ

अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण म्हणजे हिंदू असणे आवश्यक असते. असे असेल तरच ५० हजार रूपये प्रोत्साहन निधी दिला जातो.

कोट

मागील दोन वर्षांत ११२ प्रस्ताव आले आहेत. परंतु निधी नसल्याने एकालाही मदत दिली नाही. केंद्र शासनाचा निधी आला असला तरी अद्याप राज्य शासनाकडून निधी मिळालेला नाही. याबाबत पाठपुरावा सुरूच आहे.

अंकुश नखाते

समाकल्याण निरीक्षक, बीड

----

दोन वर्षांतील प्रस्ताव - ११२

मिळालेली मदत - ०