फोटो पी २२ अंजनगाव
अंजनगाव सुर्जी : कोरोनाकाळातील वीज बिल सरकारने भरावे, कृषिपंपाचे वीज बिल संपवावे, २०० युनिटपर्यंत वीज बिल फ्री करावे, त्यानंतरचे वीज बिल निम्मे करावे, या मागण्यांसाठी ४ जानेवारी रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर स्थित संविधान चौक ते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे घरापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्या ३७ मोर्चेकऱ्यांविरुद्ध भादंविचे कलम ३५३, २९४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ते गुन्हे मागे घेण्यात यावे, असे निवेदन विदर्भ राज्य आंदोलन समिती अंजनगाव सुर्जीतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
२० जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनानुसार, खोट्या केसेस परत घेतल्या गेल्या नाहीत, तर संपूर्ण विदर्भात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिला आहे. निवेदन देताना माधवराव गावंडे, गजानन दुधाट, सुनील साबळे, संजय हाडोळे, मनोहर रेचे, माणिकराव मोरे, देविदास ढोक, अरुण गोंडचोर, संजय हिंगे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.