शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन केव्हा ?

By admin | Updated: September 11, 2016 00:14 IST

मागील आठवड्यात गौरी पूजन दरम्यान नागपूर जिल्ह्यात चार मुलींचा तलावात बुडून मृत्यू व त्यापूर्वी देशपातळीवर पाहता नेपाळ येथे झालेला...

चिमुकले असुरक्षित : विद्यार्थी, शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यकगजानन मोहोड अमरावतीमागील आठवड्यात गौरी पूजन दरम्यान नागपूर जिल्ह्यात चार मुलींचा तलावात बुडून मृत्यू व त्यापूर्वी देशपातळीवर पाहता नेपाळ येथे झालेला भूकंप, पेशावर शाळेमध्ये मुलांवर झालेला दहशतवादी हल्ला या सर्व पार्श्वभूमिवर शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. देशात कुठेही भूकंप झाला की अनेकदा जिल्ह्यात ५ ते ६ ठिकाणी धक्के जाणवतात. त्यामुळे शाळांमध्ये चिमुकले असुरक्षित असल्याची भावना निर्माण होऊन पालकांचे धाबे दणाणले. आपत्ती कधी पूर्वसूचना देऊन येत नाही. त्यामुळे बचाव कसा करावा यासाठी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज आहे.अमरावती जिल्हा हा आपत्तीप्रवण जिल्हा आहे. जिल्ह्यात वर्षभर आग, पूर, वीज, अतिवृष्टी, पाऊस, गारपीट आदी आपत्ती ओढवतात. शिक्षण विभागाने यापूर्वी काही मोठ्या शहरातील शाळांना अग्निशमन यंत्रे दिलीत, मात्र याविषयीचे प्रशिक्षण दिलेले नाही. मेळघाटासह अनेक ठिकाणी यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना द्यायची गरज निर्माण झाली आहे. किंबहुना प्रशिक्षणासमवेत पाठ्यपुस्तक याविषयीचा धडा असावा, अशी भावनाही पालकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या २,८१४ शाळा आहे. यामध्ये किमान ३ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात जोवर त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण धडे देणार नाही तोवर हे चिमुकले असुरक्षित आहेत.अनेकदा शाळेत घडलेला एखादा अपघात विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याची शक्यता असते, शाळेची भिंत, छत कोसळणे, काही लावण्याने जखम होणे यासारख्या घटना वारंवार घडतात. याशिवाय शाळेमध्ये जाता-येताना रस्त्यावर एखादा अपघात घडल्यास किंवा घरात, आजूबाजूला काही अपघात झाल्यास विद्यार्थी त्यांना येत असलेल्या प्रथमोपचाऱ्याच्या प्रशिक्षणाने उपचार करू शकतात. परदेशात प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक शाळेत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात असताना आपल्या देशात का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्ह्यात २,८१४ शाळाजिल्ह्यात महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या २८१४ शाळा आहेत. यामध्ये अचलपूर २५७, अमरावती १६३, अंजनगाव सुर्जी १७३, भातकुली १४८, चांदूरबाजर २०१, चिखलदरा २२३, चांदूररेल्वे १०५, दर्यापूर २२४, धारणी २१३, धामणगाव रेल्वे १२९, मोर्शी १७१, नांदगाव खंडेश्वर १६३, तिवसा ११६, वरूड १९५, महापालिका ३३३ शाळा आहेत.राज्यातील शाळांमध्ये सव्वा कोटी विद्यार्थीराज्यात पहिली ते पाचवीपर्यंत ७४ लाख २० हजार ४८२, सहावी ते आठवीपर्यंत ४९ लाख ५४ हजार ४१५ असे एकूण १ कोटी २३ लाख ७४ हजार ८९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे शिक्षण विभागाने देणे गरजेचे आहे. प्रथमोपचार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण हवेचशालेय स्तरापासून तर विद्यार्थ्यांना प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिल्यास पुढील आयुष्यात त्यांना याचा भरपूर लाभ होऊ शकतो. आरोग्य क्षेत्रात एकीकडे दिवसागणिक नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत असताना आपल्या शिक्षण पद्धतीत मात्र प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापनाचे, आपत्कालीन प्रशिक्षणाचा समावेश नाही, ही दुर्देवाची बाब आहे. शालेय स्तरावरील इयत्ता ८ वी पर्यंतच्या मुलांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण द्यायला हवे, यामध्ये किमान प्राथमिक उपचार रुग्णवाहिकेला बोलाविणे, रुग्णाला मानसिक आधार देणे आदी बाबींचा समावेश असायला हवा.- ज्ञानेश्वर शेळके,सीईओ, आपत्कालीन व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य.