शुक्रवारी भरते बाजार : बाजार समिती प्रशासकाचे दुर्लक्षबडनेरा : बडनेऱ्यातील गुरांच्या बाजारात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून असणारे डबके व चिखल साचून आहे. बाजाराच्या दिवशी खरेदी-विक्रीदारांना याचा मोठा मन:स्ताप होत आहे. प्रशासकांनी याची दखल घ्यावी असे शेतकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत बडनेराचा गुरांचा बाजार चालतो. दर शुक्रवारी याठिकाणी गुरांचा बाजार भरत असतो. जिल्ह्यात सर्वात मोठा बाजार म्हणून याची ओळख आहे. या ठिकाणच्या बाजारात दिल्ली, पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात, मध्यप्रदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनावरे विक्रीसाठी येत असतात. बाजारात जनावरे मोठ्या संख्येत येत असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यातून मोठा सेज मिळत असतो. बडनेराच्या बाजाराची दैनावस्था झाली आहे. गुरांच्या बाजाराचा मोठा परिसर आहे. सद्या पाऊस सुरू असल्यामुळे बाजाराच्या आवारात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. रस्ता चिखलमय झाला आहे. याठिकाणी जनावरे घेवून येणाऱ्यांना याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकांनी याची पाहणी करून गुरांच्या बाजारात पावसाच्या पाण्यामुळे होणारा त्रास थांबवावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. काही ठिकाणी डांबरीकरण करणे गरजेचे आहे तर जनावरांना उभे राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.बडनेऱ्याच्या गुरांच्या बाजारात पावसाळ्यात चिखलच साचला असतो अशी परिस्थिती चांदूरबाजार व परतवाड्याच्या बाजारात नाही. पावसाळ्यात चिखल साचणार नाही याची व्यवस्था बाजार समितीने करावी. - मोहम्मद इस्त्राईल, पूर्णानगर.गुरांच्या बाजारात चालणे देखील कठीण झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे डबके साचले असतात बाजारात येणाऱ्यांसाठी ते धोक्याचे ठरत आहे. त्याची व्यवस्था करण्यात यावी. प्रशासकाने याची दखल घेणे गरजेचे आहे. - उमेश वाठ, शेतकरी, बडनेरा.
बडनेरातील गुरांच्या बाजारात पाणीच पाणी!
By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST