शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

बेल नदीवरचा वसंत बंधारा मृतावस्थेत

By admin | Updated: May 21, 2016 00:12 IST

तालुक्यात जलसिंचनाकरिता अनेक प्रयोग करून संत्राबागा, बागायती शेती जगविण्याचे प्रयोग करण्यात आले.

सिंचन विभागाचे दुर्लक्ष : १६० हेक्टर सिंचन क्षमता वरूड : तालुक्यात जलसिंचनाकरिता अनेक प्रयोग करून संत्राबागा, बागायती शेती जगविण्याचे प्रयोग करण्यात आले. याच श्रुंखलेत सांवगी (जिचकार) येथील १६० हेक्टर सिंचनक्षमता असलेला बेलनदीवर वसंत बंधारा बांधण्यात आला होता तो देखभाल, दुरुस्तीअभावी मृतावस्थेत असल्याचे चित्र आहे.सन १९७१ मध्ये वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना गुरूत्वाकर्षण शक्तीवर पाणी वळविण्याची योजना आणली होती. या योजनेला वसंत बंधारा असे नाव होते. परंतु ही योजना नद्या वाहत्या असल्या म्हणजेच यशस्वी होत होत्या. अलिकडच्या काळात नद्या कोरडया असल्याने वसंत बंधारे ओस पडले आहेत. परंतु सिंचन विभाग आणि लोकप्रतिनीधींना या गोष्टीचा विसर पडल्याने ४६ वर्षांपूर्वी २० हजार रूपयांत बांधलेला वसंत बंधारा बेवारस पडला आहे. तालुक्यात असे बंधारे सावंगी आणि चिंचरगव्हाण येथे बांधण्यात आले आहेत.ड्रायझोनमुक्तीकरिता अनेक प्रयोग केले जातात. तालुक्यात ९ सिंचन प्रकल्प असून पाच ते सहा लघु आणि मध्यम प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु ४६ वर्षांपूर्वी सावंगी आणि चिंचरगव्हाण येथे सन १९७१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बारमाही वाहत्या नदीतून ‘पाणी वळवा’ प्रकल्पांतर्गत वसंत बंधारे आणले होते. काही दिवसांनी नदी कोरडी झाल्याने कालव्याची दुर्दशा झाली. सावंगीच्या वसंत बंधाऱ्याची त्या काळात केवळ २० हजार रुपयांत निर्मिती करण्यात आली होती. येथून गुरूत्वाकर्षणाव्दारे शेतात कालव्याच्या, पाटचऱ्यांच्या माध्यमातून पाणी नेऊन सिंचन केले जात होते. या बंधाऱ्याची क्षमता १६० हेक्टर जमिनीचे सिंचन करण्याची आहे. परंतु ४६ वर्षांपासून मृतावस्थेतील बंधाऱ्याकडे कुणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही तर उलट नवनीवन प्रयोग करतात कधी श्रमदानातून तर कधी रोजगार हमी योजनेतील ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानावर काम केले जाते. परंतु आजही तालुक्यात शेकडो सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे धूळखात पडून आहेत. या बंधाऱ्याची संकल्पना आताच्या वर्धा डायव्हर्शनसारखीच होती. यातून कालवे आणि पाट काढून सिंचनाकरीता पाणी वापरात आणले जाणार होते. परंतु राजकारण्याचे दुर्लक्ष व अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे तेव्हाचे लाखो रुपये पाण्यात गेले. या बंधाऱ्यामुळे सावंगी, आमपेंड, मुसळखेडा, वाठोडा, एकदरा, ढगा, नायगांव, उदापूर, घोराड, खानापूर मेंढी, देवूतवाडा जवळपास एक हजार हेक्टर जमीन लाभक्षेत्रात येणार होती. यामुळे या परिसराचा कायापालट करण्याची योजना होती. परंतु बांधकामानंतर या बंधाऱ्याची दुर्दशा झाली भिंती, दरवाजे, पाईपलाईन ओस पडल्या. या बधांऱ्याची देखभाल दुरस्ती केली असती तर आज शेतकऱ्यांना पाणी टचांईला सामोरे जावे लागले नसते. पंरतू या बंधाऱ्याला राजाश्रय तर मिळाला नाही तर अधिकाऱ्यांनीसुद्धा कधीकाळी ढुंकून पाहिले नाही. एकीकडे वॉटर कपच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे श्रमदानातून केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन कालवा साफसफाई केली. परंतु यामध्ये पाणी येणार तरी कुठून, हा प्रश्न आहे. बंधाऱ्याच्या भिंतीला गेट नाही. पाणी अडविल्या जात नाही. केवळ राजकारणाला राजकारण करीत याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. बंधाऱ्याची देखभाल आणि दुरस्ती केल्यास याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होऊन शेकडोे हेक्टर सिंचन केले जाऊ शकते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. यासाठी बंधाऱ्याचे पुनरूज्जीवन होणे महत्त्वाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)देखभाल,दुरुस्तीचा प्रस्ताव १० वर्षांपासून धूळखात !पाटबंधारे विभागाच्या शेकदरी सिंचन व्यवस्थापन शाखेच्यावतीने तालुक्यातील वसंत बंधारे, कोल्हापुरी बंधारे तसेच प्रकल्पाच्या देखभाल दुरस्तीकरिता केंद्रशासनाला दुरस्ती, संचय आणि नूतणीकरण अभियानामध्ये १० वर्षांपासून प्रस्ताव पाठविला आहे. परंतु केंद्रीय जलआयोगाने अद्यापही परवानगी दिली नसल्याने हा प्रस्ताव धूळ खात आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास बंधाऱ्याचा कायापालट होऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.