शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पर्यावरण मान्यतेअभावी रखडला वासनी प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:03 IST

वासनी प्रकल्प पुर्ण झाल्यास ६६९१ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. पण, या प्रकल्पाला पर्यावरणाच्या मान्यतेचा खोडा निर्माण झाला असून, डिसेंबर २०१६ पासून सदर प्रकल्पाचे काम हे बंद आहे. पर्यावरणाच्या मान्यतेचा प्रश्न हा शासनस्तरावर प्रलंबित असून, मान्यता मिळाल्यास २४ महिन्यांत धरणाची कामे (घळभरणी) होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ६० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्दे४० टक्के धरणाची कामे प्रलंबित : ६० कोटींच्या निधीची मागणी

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वासनी प्रकल्प पुर्ण झाल्यास ६६९१ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. पण, या प्रकल्पाला पर्यावरणाच्या मान्यतेचा खोडा निर्माण झाला असून, डिसेंबर २०१६ पासून सदर प्रकल्पाचे काम हे बंद आहे. पर्यावरणाच्या मान्यतेचा प्रश्न हा शासनस्तरावर प्रलंबित असून, मान्यता मिळाल्यास २४ महिन्यांत धरणाची कामे (घळभरणी) होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ६० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे.धरणाची कामे ६० टक्के पूर्ण झाली असून, जलोत्सारणीची कामेही ८० टक्के झाली आहेत. या प्रकल्पाची अद्यावत किंमत ही ७५१.६७ कोटी झाली आहे. २००८ मध्ये जेव्हा सदर प्रकल्पाच कामे सुरू करण्यात आले तेव्हा या प्रकल्पाची मूळ किंमत ही १०२.८१ कोटी होती. या प्रकल्पावर मार्च २०१८ पर्यंतच्या अहवालानुसार ५०२.७३ कोटी रुपये खर्च झाला आहे. परंतु, या प्रकल्पाच्या कामे सुरू झाल्यानंतर पर्यावरण विभागाकडून मान्यता घेणे अनिवार्य होते; तसे झाले नाही. या अनुषंगाने यासंदर्भात एक याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. त्याकारणाने सदर कामे ही थांबवावी लागली आहे.वासनी प्रकल्प हा अचलपूर तालुक्यातील वासनी बु. गावाजवळ सपन नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माती धरणाची लांबी ही २१०० मीटर व दगडी धरणाची (जलोत्सारणी) लांबी १४२ मीटर असून, महत्तम उंची १३ मीटर आहे. या प्रकल्पाच्या उजव्या बाजूकडून १३.२८ किमी लांबीचा कालवा उद्गमित होत आहे.प्रकल्पामुळे तीन तालुक्यांतील २३ गावांतील ४३१७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. प्रकल्पीय जलसंचय हा २२.५९ दलघमी राहणार आहे.भूसंपादनासाठी ६० कोटींची गरजप्रकल्पासाठी ७२१.१६ हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी थेट खरेदीने १४०.८५ हेक्टर संपादित करून करण्यात आली, तर भूसंपादन कायद्याने १४२.७२ हेक्टर संपादित करण्यात आली आहे. २७० हेक्टरची तीन प्रकरणे निवाडा स्तरावर असून, यासाठी ६०.१४ कोटी देणे बाकी आहे. त्यासाठी विभागाने महामंडळास मागणी केली आहे. यामध्ये २४.३६ हेक्टर वनजमीनसुद्धा संपादित करण्यात आली आहे. विभागाने पर्यावरण मान्यतेची कार्यवाही करण्यात आली असून, ही मान्यता अद्याप अप्राप्त असल्याने कामे रखडली आहेत.या कामांसाठी निधीची मागणीसन २०१८-१९ करिता ६० कोटींची अतिरिक्त पूरक मागणी करण्यात आली असून, यामध्ये धरणाच्या मुख्य कामाकरिता ७.०० कोटी, पुनर्वसन कामाकरिता ८.०० कोटी, भूसंपादनाकरिता ४०.०० कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ५.०० कोटी, अशी मागणी करण्यात आली असून, पुनर्वसन व भूसंपादनाची कामे लवकर पूर्ण झाल्यास प्रकल्पाची घळभरणी नियोजित वर्षात पूर्ण करण्यात येईल व जलसंचय होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.राज्य शासनाकडून एक ते दीड महिन्यात पर्यावरण मान्यतेचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. यानंतर प्रकल्पांची कामे पुन्हा सुरू होतील.- रमेश ढवळे,अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग