‘त्या’ राज्यपक्ष्यांचा मृत्यू विषप्रयोगानेच : प्राथमिक वैद्यकीय अहवालबडनेरा : राज्य पक्षी म्हणून मान्यताप्राप्त पाच हरियाल व अन्य प्रजातीच्या चार पक्षांचा शुक्रवारी झालेला मृत्यू विषप्रयोगानेच असल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून पुढे आले आहे. शनिवारी आणखी दोन पक्षी मृत आढळल्याचे समझते. बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात पिंपळाच्या झाडावर वास्तव्यास असणाऱ्या हरियाल, बुलबुल व मैना या पक्षांचा विषप्रयोगाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार ३ मार्च रोजी समोर आली. ९ पक्ष्यांचा यात मृत्यू झाला. या घटनेनंतर वनविभागाने मृत पक्षांना शवविच्छेदनासाठी पशू संवर्धन विभागाकडे पाठविले होते. प्राथमिक वैद्यकीय अहवालात या सर्व पक्षांचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र कोणत्या विषाने या पक्षांचा मृत्यू झाला, हे फॉरेन्सिक तपासणीच्या अहवालानंतरच समोर येणार आहे. त्याचा नमुना नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे. त्या झाडाच्या फांद्या तोडल्याबडनेरा : या पक्ष्यांच्या मृत्यूनंतर वनविभागाने घटनास्थळारून चार संशयितांना ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात ज्या पिंपळाच्या झाडावरील पक्षी मृत पावले. त्याच परिसरात परप्रांतीयांची राहुटी होती. परिसरवासीयांच्या मते त्यांनी पक्ष्यांचे मांस खाण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग केल्याचा आरोप होत आहे. त्याआधारे वनविभागाने चार संशयितांना ताब्यात घेतले. अद्याप त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजते. वनविभागाने प्रतिबंधक उपाय म्हणून बडनेरा वर्तुळातील तीन कर्र्र्र्मचाऱ्यांना घटनास्थळी तैनात केले. पिंपळाच्या झाडावरील फळ व पानांवरील विष इतर पक्षाने खाऊ नये यासाठी पुढील उपाययोजना म्हणून या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. पक्षप्रेमी व परिसरवासीयांना इतर पक्ष्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परप्रांतीयांच्या राहुट्या गायब बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय झोपड्या बांधून वास्तव्यास होते. पक्षांच्या मृत्युनंतर मुसाफिरांचा जमावडा येथून पसार झाला आहे. रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी आतातरी याकडे लक्ष पुरवावे, असे शहरवासीयांंमध्ये बोलले जात आहे. विषप्रयोगानेच हरियाल व इतर प्रजातीच्या पक्षांचा मृत्यू झाला. कोणत्या प्रकारचे विष होते, हे तपासण्यासाठी त्याचा नमुना नागपूरच्या ‘फॉरेन्सिक’ लॅबला पाठविण्यात आला आहे. - किशोर चिठोरे, पशुधन विकास अधिकारी, पशु संवर्धन विभागसंशयितांची कसून चौकशी केली जात आहे. अन्य पक्ष्यांनी पिंपळाच्या झाडाचे फळ खाऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून खबरदारी घेतली जात आहे. लवकरच यातील नेमके सत्य समोर येईल. - हरिशचंद्र पडगव्हाणकर, आरएफओ
आणखी दोन पक्षी मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:08 IST