शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘ट्रायबल’चा राखीव पेट्रोल पंप बिगर आदिवासीच्या घशात!

By गणेश वासनिक | Updated: May 10, 2024 15:27 IST

Amravati : पेट्रोलियम मंत्रालयाने फासला उच्च न्यायालयाच्या निर्णयाला हरताळ, १६ वर्षांपासून आदिवासी महिलेचा एकाकी लढा

अमरावती : आदिवासींकरीता राखीव असलेला पेट्रोल पंप बिगर आदिवासीच्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. मात्र आपल्या हक्काचे पेट्रोल पंप मिळावे, यासाठी पुणे येथील तेजश्री आकाश साबळे ही आदिवासी महिला गत १६ वर्षापासून सतत लढा देत आहे. याप्रकरणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्याही निर्णयाला हरताळ फासल्याची बाब समोर आली आहे.

तेजश्री साबळे यांनी ‘लोकमत’ मध्ये २४ नोव्हेंबर २००६ रोजी प्रसिद्ध झालेल्या इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या जाहिरातीनुसार सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील पेट्रोल पंपासाठी आवश्यक कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला होता. डिलर सिलेक्शन बोर्डाने मुख्य विभागीय रिटेल सेल्स मॅनेजर, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. पुणे यांनी मुलाखत घेतली आणि उमेदवारांची निवड केली. निवड यादीत तेजश्री साबळे या महिलेला समितीने वयानुसार गुण दिले नाही. अनुभव प्रमाणपत्रालाही गुण न देता कमी गुणांकन करुन स्पर्धेत बाद केले आणि बिगर आदिवासी असलेल्या नागपूर विभागातील गणेश माणिकराव ताथे यांना पेट्रोल पंपाची डिलरशिप देण्यात आली. परंतु अन्यायग्रस्त तेजश्री साबळे यांनी ही बाब २२ मे २००८ रोजी इंंडियन ऑईल कॉर्पोरेशन पुणे येथील मुख्य विभागीय किरकोळ विक्री व्यवस्थापक यांच्या निदर्शनास आणून दिली होती. नियमानुसार उमेदवार सांगली, पुणे आणि कोल्हापूर विभागातील अपेक्षित असताना जाहिरातीत दिलेल्या नियमांचे उल्लंघन करुन नागपूर विभागातील उमेदवारांना पेट्रोल पंप देण्यात आला. मात्र तेजश्री साबळे या महिलेने या अन्यायाविरूद्ध आजतागायत निरंतरपणे लढा सुरूच ठेवला आहे.

तरीही तेजश्रींना पेट्रोल पंप मिळाला नाहीच?राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने ६ नोव्हेंबर २०१६ रोजी इंडियन ऑईल कार्पोरेशनला नोटीस जारी केली. त्यानंतर वांद्रे, मुंबईचे कार्यकारी संचालक यांनी उच्च न्यायालय मुंबई यांनी ५ ऑक्टोबर २०११ रोजी दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत आयओसीएलने ९ नोव्हेंबर २०११ ते २२ जुलै २०१६ पर्यंत डिलरला पत्र पाठवून वेळोवेळी जातपडताळणी समितीकडून त्यांच्या जातीची पुष्टी करावी, असे कळविले. २० ऑगस्ट २०१६ ला आयओसीएलने गणेश ताथे हे अनुसूचित जमातीचे नाहीत. त्यानंतर आयओसीएलने १० मे २०१७ रोजी त्यांची डिलरशीप संपुष्टात आणली. तरीही तक्रारदार तेजश्री साबळे यांना पेट्रोल पंपाची डिलरशिपची देण्यात आलेली नाही. 

कोर्टाच्या निर्णयालाही केराची टोपलीतेजश्री साबळे यांनी न्याय मिळण्यासाठी वारंवार आयओसीएलचे विक्री व्यवस्थापक पुणे यांना अर्ज केले. परंतु कारवाई न केल्यामुळे त्यांनी नाईलाजास्तव न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात २०११ साली रिट पिटीशन क्रमांक ३५५५/०१ दाखल केले. तत्कालीन न्यायमूर्ती डी. डी. सिन्हा आणि न्यायमूर्ती व्हि.के.रमाणी यांनी ५ ऑक्टोबर २०११ रोजी याचिकेवर निर्णय देऊन आठ आठवड्याच्या आत प्रक्रियेनुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु कोर्टाच्या निर्णयालाही केराची टोपली दाखविण्यात आली.

१६ वर्षापासून आयोगाने सुनावणीच घेतली नाही.आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काचे संरक्षण व्हावे. त्यांचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा याकरिता आणि घटनात्मक असलेल्या राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने तब्बल १६ वर्षापासून वारंवार तक्रार दाखल असलेल्या प्रकरणांवर अद्यापपर्यंत सुनावणीच घेतली नसल्याचा आरोप ट्रायबल फोरमचे राज्य उपाध्यक्ष बाळकृष्ण मते यांनी केला आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीPetrol Pumpपेट्रोल पंप