शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यावर कारवाई नाही

By admin | Updated: August 27, 2015 00:29 IST

रेती तस्करांविरुध्द लढा देत असताना मोहन बटाऊवाल्यांना आपल्या मुलाची हत्या होत असताना उघड्या डोळ्यांनी बघावे लागले.

वडिलांसमोर झाली मुलाची हत्या : तहसीलदाराच्या पाठीशी कोण?अमरावती /अचलपूर : रेती तस्करांविरुध्द लढा देत असताना मोहन बटाऊवाल्यांना आपल्या मुलाची हत्या होत असताना उघड्या डोळ्यांनी बघावे लागले. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या पायांना अपंगत्व आले. या घटनेची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अचलपूर, परतवाडा व सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या तडकाफडकी बदल्या केल्यात. परंतु या घटनेसाठी खऱ्या अर्थाने जबाबदार असलेल्या महसूल विभागाच्या एकाही अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झाली नाही. रेती तस्करांचे ट्रॅक्टर शेतातून जात असल्याने पिकांची नासाडी होत होती. त्यामुळे वाळू तस्करांच्या विरोधात विलायतपुऱ्यातील रहिवासी मोहन बटाऊवाले यांनी एल्गार पुकराला होता. कित्येकदा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली. परंतु संबंधित अधिकारी देखाव्यापुरती कारवाई करीत होते. आपण वाळू तस्करांविरुध्द कडक कारवाई केली होती, असे म्हणून ते स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. महसूल विभागाने लाखो रुपयांचा महसूल गोळा केला असला तरी कोट्यवधी रूपयांची वाळू चोरी झाली त्याचे काय?, असे लोकांचे म्हणणे आहे.वाळू चोरीमध्ये कोणत्या लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते सहभागी होते, हे सर्वश्रुत आहे. रेती तस्करी रोखण्याची खरी जबाबदारी महसूल विभागाची आहे. मंडळ अधिकारी प्रभारीअचलपूर-परतवाड्यात बिनदिक्कत रेती तस्करी होत असताना शहरातील मंडळ अधिकारी अनिल पोटे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. येथील मंडळ अधिकारी सोनल फुंदे या गेल्या वर्षभरापासून पुणे येथे ट्रेनिंगला गेल्या आहेत. वास्तविक येथे कायमस्वरुपी मंडळ अधिकाऱ्याची गरज आहे. मात्र, येथे प्रभारी अधिकारी नेमण्यात आला. येथे कर्तव्यदक्ष व प्रामाणिक मंडळ अधिकारी नेमावा, अशी जनतेची जोेरदार मागणी आहे.लवकरच झाली उचलबांगडीदोन वर्षांपूर्वी अचलपूर येथे सुधीर राठोड तहसीलदार म्हणून आले होते. त्यांच्या कार्यकाळात गौणखनिजाची तस्करी, अवैध कामांना ब्रेक लागला होता. त्यामुळे भ्रष्ट नेते मंडळीमध्ये त्यांच्या विरोधात असंतोष असला तरी सामान्य जनता त्यांच्या कामाबद्दल कमालीची समाधानी होती. पण, एका लोकप्रतिनिधीने मुंबईपर्यंत राजकीय वजन खर्च करुन त्यांची येथून बदली केली. वाळू तस्करांविरुध्द २०१३-१४ मध्ये १३८ प्रकरणात कारवाई करण्यात आली. १ लाख ९६ हजार ५६५ रुपये दंड वसूल केला. २०१५ मध्ये १५ मार्चपर्यंत एकूण २०३ प्रकरणी कारवाई करण्यात आली तर २०१५-१६ या आर्थिक वर्षात परतवाडा २, अचलपूर ३, आसेगाव येथे पाच कारवाया झाल्यात. -मनोज लोणारकर, तहसीलदाररेती तस्करीसंबंधी आम्ही जिल्हाधिकारी व आयुक्तांकडेही लेखी तक्रारी केल्या होत्या. पण, उपयोग होत नव्हता. हा प्रकार रोखला असता तर अमित ची हत्या झाली नसती. त्याच्या हत्येस तहसीलदारच जबाबदार आहेत. परंतु अजूनही त्यांचेवर कोणतीच कारवाई नाही.-अमोल गोहाड अध्यक्ष, युवा गर्जना संघटना