शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

स्वच्छतेचा बोजवारा, कर्मचारी गायब, कचरा कंटेनर गेले कुठे?, प्रवीण पोटे पाटील यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 13:12 IST

महापालिकेत प्रभागनिहाय स्वच्छतेचा आढावा; मूळ कंत्राटदारांची दांडी, आरोग्य निरीक्षकांची कानउघाडणी

अमरावती : शहरात डेग्यू, अस्वच्छतेचा कहर माजला आहे. साथीच्या आजारांनी सार्वजनिक, खासगी रुग्णालये हाउसफुल्ल असे चित्र असताना महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना शून्य आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत शहरातील अस्वच्छता, सफाई कर्मचारी गैरहजर, कचरा कंटेनर आणि स्वच्छता कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. एका प्रभागात स्वच्छतेसाठी दरमहा ८ ते ९ लाखांचे देयके दिले जात असेल तर सामान्य नागरिकांची ओरड का? असा संतप्त सवाल आयुक्तांच्या पुढ्यात उपस्थित केला.

आयुक्तांच्या दालनालगतच्या सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी नाल्या सफाई, कचरा संकलन, कंटेनर, डास निर्मूलन फवारणी, सफाई कर्मचारी गैरहजर अशा एक ना अनेक विषयांवर बोट ठेवले. दरम्यान स्वच्छतेसंदर्भात प्रभागनिहाय आढावा घेताना त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करून आराेग्य निरीक्षक, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची बोलती बंद केली. यावेळी बहुतांश प्रभागातील मूळ स्वच्छता कंत्राटदार गायब असल्याचे दिसून आले.

आढावा बैठकीला आयुक्त देवीदास पवार, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी महापौर संजय नरवणे, उपमहापौर चेतन पवार, सचिन रासने, जयंत डेहनकर, सुनील काळे, संध्या टिकले, राधा कुरील, सुरेखा लुंगारे, बलदेव बजाज, कुसुम साहू यासह उपायुक्त मेघना वासनकर, स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे, योगेश पिठे, नंदकिशोर तिखिले, धनंजय शिंदे आदी उपस्थित होते.

- तर कंटेनरचे तीन कोटी परत करा

शहरात नाल्या तुंबल्या. कचरा साचला. १० ते १५ दिवसांपर्यंत कचरा उचलला जात नाही. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची बोंबाबोंब आहे. घंटागाडी दिसत नाही. प्रभागातील आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी गायब असतात. त्यामुळे डीपीसीतून महापालिकेला कंटेनर खरेदीसाठी दिलेले तीन कोटी रुपये परत करा, असे म्हणत महापालिका प्रशासनाच्या कारभारावर आमदार प्रवीण पोटे पाटील कडाडले.

शहर स्वच्छ हवे; अन्यथा काम सोडा

दैनंदिन स्वच्छता कंत्राटदारांची गत पाच महिन्यांपासून देयके थकीत असल्याचा मुद्दा आमदार पोटे पाटील यांच्यासमोर उपस्थित झाला, तेव्हा अगोदर शहर स्वच्छ ठेवा; अन्यथा काम सोडा, असा सल्लाही त्यांनी कंत्राटदारांना दिला. दरारोज ५५ कर्मचारी हजेरीपत्रकात दर्शविले जातात. मुळात १० ते १५ कर्मचारीच कर्तव्यावर असतात. या विषयाला दोषी कोण? असे म्हणत त्यांनी महापालिकेने तुमचे पैसे बुडविले नाहीत. आज नाही तर उद्या मिळतील; पण अगोदर स्वच्छतेचे काय? याचा विचार करा, असे आयुक्त देवीदास पवार यांना ते म्हणाले.

...अन् आयुक्तांना दाखविले अस्वच्छेतेचे छायाचित्र

आमदार प्रवीण पोटे पाटील हे महापालिकेत आढावा घेणार असल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांच्या भागातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, नाल्यांची वस्तुस्थिती दर्शविणारी छायाचित्रे सोबत आणण्याचे कळविले होते. त्यानुसार शहरातील सर्वच प्रभागांतून भाजप कार्यकर्त्यांनी सोबत आणलेली छायाचित्रे आयुक्त पवार यांना दाखवीत शहराचा हा बोलका आरसा आहे, असे म्हणत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी प्रशासनाची पोलखोल केली.

तत्कालीन आयुक्तांवरही तोंडसुख?

तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या कारनाम्याची यादी वाचताना त्यांनी अमरावती महानगर कसे मागे नेले, यावरून आमदार प्रवीण पोटे पाटील प्रचंड संतापले. कर्मचारी काम नाही करत, तर दुसरी व्यक्ती नियुक्त करा. स्वच्छता झाली पाहिजे. कंत्राटदारांना काम जमत नसेल, तर सोडून द्या, लीडरशिप करू नका, असेही ते म्हणाले. कंत्राटदार न्यायालयात गेल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन आयुक्त आष्टीकर यांच्यावर त्यांनी चांगलेच तोंडसुख केले.

टॅग्स :AmravatiअमरावतीlocalलोकलPravin Potte Patilप्रवीण पोटे पाटील