अमरावती : २००४ मध्ये झालेल्या त्सुनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंद कमी झाला. दर एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमिटरने ओढली जात आहे. दर वर्षाला चंद्र पृथ्वीपासून ३.८ सेंटीमिटर लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल.पाच खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. न्यूयार्क शहर दरवर्षाला लंडनपासून २.५ सेंटीमिटरने दूर जात आहे. पृथ्वीचे पर्यावरण संतुलन कायम ठेवणे ही काळाची गरज आहे. नाहीतर पृथ्वीचे थोड्याच दिवसांत वाळवंट होईल. आतापासूनच यासाठी उपाययोजना करणे जरूरी आहे. अशनी (उल्का) पृथ्वीला टक्कर देऊ शकते : एखादी अशनी पृथ्वीला टक्कर देऊ शकते. अशनीचा वेग हा ताशी ७२,००० ते २ लक्ष १६ हजार कि. मी. असू शकतो. अशनी जर समुद्रात पडली तर लाटा उसळतात जमिनीवर जर पडली तर विवर तयार होते. धूळ आकाशामध्ये पोहोचते सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ शकत नाही. पृथ्वीचे तापमान शून्याखाली ६० ते ७० अंशापर्यंत पोहोचते. पृथ्वीवर भूकंप होऊ शकतो. ६.५ कोटी वर्षापूर्वी मेक्सीकोतील युकानात प्रदेशात अशनी धडकली यामुळे डायनासोर नष्ट झाले असावे असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. स्पेश वॉच प्रकल्प : नासाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून धुमकेतू व अशनीकडे लक्ष ठेवले जाते व उपाययोजना केल्या जातात.
पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होत आहे
By admin | Updated: June 5, 2015 00:34 IST