जुगाराला सुगीचे दिवस : विरंगुळा म्हणून खेळतात डाववरुड : परंपरेच्या नावावर तालुक्यातील गावांमध्ये पोळ्याच्या सणात जुगार खेळण्याला उधाण येत असते. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यत, सर्वच आधीन गेल्याचे दिसून येते.जुगाराची परंपरा सुरु राहावी म्हणून पोलीसांनी दोन दिवस सूट देऊन दुर्लक्ष करावे, असे गावातील नागरिकही म्हणतात. यामुळे वरुडमध्ये दोन जुगाऱ्यांना सुगीचे दिवस असते. परंतु प्रतिष्ठांच्या मागणीनुसार पोलीस प्रशासन यावर अंकुश ठेवण्यास असमर्थ ठरतात. परंतु ही परंपरा कितपत योग्य आहे, असा सवाल सुध्दा काही नागरिक करीत आहेत. भारतीय संस्कृतीत पोळा सणाला महत्त्व आहे. संस्कृतीनुसार प्रत्येक सण गुण्यागोविंदाने साजरा करतात. कृषिप्रधान देशात बळीराजा कितीही हवालदिल असला तरी कामधेनू म्हणून असलेल्या बैलाला पोळयाच्या दिवशी गोडधोड खावू घालून धुरकऱ्यांना नविन कपडे तर बैलांना झुली चढवून बाशिंगे बांधतात. मात्र, पारंपारीक पध्दती सुध्दा काही वेगळयाच आहे. त्या प्रथा नव्या तरण्या मुलांनी सुध्दा मान्य करुन पोळ्यात जुगार खेळण्याची प्रथा आहे. पोलीसांनी कितीही बंधने लादली तरी नागरीकसुध्दा पोळ्यात सूट देण्याची भाषा बोलतात. परंतु पुढे हेच नवयुवक जुगाराच्या आहारी जाऊन घरातील मालमत्ता गहाण ठेवण्यापर्यंत मजल गाठतात. जुगारात पैसे हरल्यामुळें आत्महत्या करुन कूटूंब उघडयावर आणल्याने या कुप्रथेला आळा घालणे आवश्यक आहे. परंपरेच्या नावावर चालणारा जूगार बंद करण्याकरीता पोलीसांनी कठोर पावले उचल्यास बंदी येऊ शकते. जुगाऱ्यांचेसुध्दा नेटवर्क पोलिसांपेक्षा सक्षम असल्याने रस्त्यारस्त्यावर माणसे उभी करुन मिनीटागणिक माहिती सुरू असते. वरुड तालुक्यात पोळ्याच्या परंपरेच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा जुगार खेळला जातो.
तालुक्यातील लोकांची फसवेगिरी करणाऱ्या तीन आरोपींपैकी स्वत:ला पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने जिल्हा पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य
By admin | Updated: September 12, 2015 00:18 IST