शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

‘रासेगाव’ तालुक्यातील पहिले ‘स्मार्ट ग्राम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:00 IST

‘रासेगाव’ अचलपूर तालुक्यातील पहिले ‘स्मार्ट ग्राम’ ठरले आहे. यात गावाने केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव शासनाकडून करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशासनाकडून गौरव : विविध विकासकामांच्या कार्याचा गौरव, प्लास्टिकसह कुऱ्हाडबंदी यशस्वी

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ‘रासेगाव’ अचलपूर तालुक्यातील पहिले ‘स्मार्ट ग्राम’ ठरले आहे. यात गावाने केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव शासनाकडून करण्यात आला आहे.आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त रासेगाव ग्रामपंचायत अंतर्गत लोक सहभागातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली. ३,५०० लोकसंख्येच्या या गावात प्लास्टिकबंदी आणि कुऱ्हाड बंदी करण्यात आली. गावाच्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून वृक्ष लागवड करण्यात आली आहे.पाणीपुरवठा अंतर्गत गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा असून वर्षभरात एकदाही लाल कार्ड गावाला लागले नाही. गावच्या पाणी पुरवठ्याला हिरवे कार्ड असून नळाच्या पाण्याचाच वापर गावकरी करीत आहेत. स्वच्छता, व्यवस्थापन, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानात गावाने पूर्ण पैकी पूर्ण गुण प्राप्त केले आहेत. रासेगावात गतवर्षी परिणामकारकरित्या घनकचरा व्यवस्थापन राबविल्या जात असून लोकसहभागातून ग्रामस्वच्छता ही संकल्पना गावकऱ्यांनी स्विकारली आहे. वैयक्तिक शौचालय सुविधाचा वापर शंभर टक्के असून सुकन्या समृद्धी योजनेसह केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी गावपातळीवर केल्या गेली. दशसूत्रीचे पालन करणाऱ्या गावातील बचतगटांत महिलांचा सहभाग आहे. जल संधारणाच्या कामातही गाव आघाडीवर आहे. गावाला स्मार्ट करताना गावकऱ्यांनी राळेगणसिद्धी आणि राहुरी कृषी विद्यापीठाला भेट दिली. या दौऱ्यात समाजसेवक अण्णा हजारेंकडून गावविकासाची संकल्पना समजून घेतली. ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी तर विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत सबस्टेशनकडे थकीत असलेल्या २८ लाखांचा कर वसूल केला. अशाप्रकारे कल वसूल करणाऱ्या आणि गावातील डी. बी. वर कर लावणाऱ्या या पहिल्या ग्रामसेविका ठरल्यात. सरपंच अनुराधा मोरे, उपसरपंच उमेश गायगोले, सर्व ग्रा.पं. सदस्य, जि.प. व पं.स.चे आजी-माजी सदस्य आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने रासेगाव ‘स्मार्ट ग्राम’ बनल्याचे ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी स्पष्ट केले. गटविकास अधिकारी जयंत बाबरे, विस्तार अधिकारी गेडाम यांचेसह पंचायत समिती स्तरावरून मिळालेले मार्गदर्शनही यात उल्लेखनीय राहले.