शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
4
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
5
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
6
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
7
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
8
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
9
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
10
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
11
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
12
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
13
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
14
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
15
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
16
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
17
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
18
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
19
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

सहा दिवसांनी येतो पॉझिटिव्ह असल्याचा कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST

अमरावती : हायरिस्कमधील व्यक्तींनी कोरोना टेस्टकरिता स्वॅब दिल्यानंतर त्यांना चाचणी अहवाल माहिती व्हायला किंवा आरोग्य यंत्रणेचा फोन जायला किमान ...

अमरावती : हायरिस्कमधील व्यक्तींनी कोरोना टेस्टकरिता स्वॅब दिल्यानंतर त्यांना चाचणी अहवाल माहिती व्हायला किंवा आरोग्य यंत्रणेचा फोन जायला किमान सहा ते सात दिवस लागत आहे. तोवर या पॉझिटिव्हचा सर्वत्र मुक्त संचार झालेला असतो. यात यंत्रणेची दिरंगाई असल्याने कसा रोखणार कोरोना, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

काही रुग्ण अँटिजेन चाचणीच्या आधारे रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेत व उपचारानंतर सहा दिवसांनी त्यांना डिस्चार्जदेखील मिळाला. त्यानंतर तुम्ही आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह असल्याचे फोनद्वारे सांगण्यात येत आहे. या व्यक्तींनी जर ॲन्टिजेन चाचणी केली नसती तर त्याला पॉझिटिव्ह आहे हे माहिती व्हायला सहा ते सात दिवस लागले असते व त्याचे संसर्गातून कित्येक जण बाधित झाले असते. किंबहुना संक्रमित होतही आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा समर्ग वाढताच आहे. १ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत १७,५४५ रुग्णांची नोंद झालेली आहे. या रुग्णांचे हायरिस्कमधील व्यक्तींनी कोरोना चाचणी केल्यानंतर प्रत्येक जण क्वारंटाईन राहत नाही. त्यामुळे चाचणी अहवाल लवकर मिळणे अपेक्षित असताना अलीकडे सहा दिवसांवर कालावधी लागत आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजार, तर महापालिका क्षेत्रात २५ हजारांच्या घरात आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता अमरावती शहरच आता कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले. मात्र, शासनाचे गाईडलाईननुसार कंटेनमेंट झोनमधील तरतुदी पुरेशा लागू केलेल्या नाहीत. शहरात साईनगर, राजापेठ, दस्तूरनगर, अर्जुननगर आदी भाग कोरोनाचे हॉट स्पॅाट बनले आहेत. याशिवाय ग्रामीणमध्ये अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, मोर्शी तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतीच आहे. या भागात कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढवायला पाहिजे. मात्र, अलीकडे या प्रकाराचा विसर आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

बॉक्स

मोबाईलवर मिळणार पॉझिटिव्ह- निगेटिव्हचा मेसेज, जिल्हाधिकारी

विद्यापीठ लॅबची क्षमतावाढ या आठवड्यात झालेली आहे. त्यामुळे रोज १,६०० वर नमुन्यांची तपासणी होते. आता तर चार शिफ्टमध्ये काम होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नमुन्यांची होईल. सधारणपणे तिसरे दिवशी अहवालाविषयी माहिती व्हायला पाहिजे. आता स्वॅब देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पॅाझिटिव्ह, निगेटिव्ह याची दोन दिवसांत माहिती देणारा मेसेज मिळणार आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून असे मेसेज जातील, याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. एका संस्थेच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’ला दिली.

बॉक्स

अशी आहे स्वॅब दिल्यानंतरची प्रक्रिया

संशयित रुग्णाने स्वॅब दिल्यानंतर त्याला साधारणपणे उणे पंचवीस या तापमानात ठेवण्यात येते व त्यानंतर सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. या ठिकाणी मशीनमध्ये एका वेळी किमान २०० नमुन्यांची तपासणी होते व या प्रक्रियेला चार तास लागतात. येथून रिपोर्ट सीएस कार्यालयास व तेथून डीएचओ व एमओएच यांच्याकडे जातात व नंतर संबंधित व्यक्तीला फोन करून पॉझिटिव्ह अहवाल असल्याचे सांगितले जाते.

बॉक्स

येथे होते दिरंगाई

स्वॅब सेंटरमधील नमुने पुरेसे ‘फ्रोजन आईस पॅक’ झाले नसतील तर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवूण दुसरे दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. लॅबमध्येही अगोदरचे प्रलंबित नमुने मशीनवर लावले गेले असतील तर थोडा उशीर होतो. लॅबद्वारा अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास आरोग्य यंत्रणेद्वाराही फोन करण्यास पुढचा दिवस निघतो. रुग्णसंख्या जास्त असल्यास प्रत्येक प्रक्रियेमध्ये विलंब होतो.

पाईंटर

दिनांक नमुने तपासणी पॉझिटिव्ह

१ मार्च २,१९६ ६९९

२ मार्च २,२७६ ६३६

३ मार्च २,४९६ ६७१

४ मार्च २,६९४ ६७३

५ मार्च २,५६६ ६५१

६ मार्च २,८२३ ६३१

७ मार्च २,२३२ ४४६

८ मार्च ०००० ०००