शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
3
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
4
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
5
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
6
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
7
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
8
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
10
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
11
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
12
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
13
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
14
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
15
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
16
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
18
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
19
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
20
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन

शेतकरीपुत्र ते डीआरडीओचा शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:31 IST

अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथील शेतकरीपुत्र आतिष तायडे याने उंच भरारी घेतली आहे. देशभरात शास्त्रज्ञ घडविणारी संस्था म्हणून नावलौकीक असणाऱ्या रक्षा अनुसंधान व विकास संघटना ‘डीआरडीओ’ हैद्राबाद येथे शास्त्रज्ञ म्हणून त्याची निवड झाली आहे.

ठळक मुद्देमल्हारा येथील तरुणाची यशकथा : कठोर मेहनत, आयआयटीतून संधी

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथील शेतकरीपुत्र आतिष तायडे याने उंच भरारी घेतली आहे. देशभरात शास्त्रज्ञ घडविणारी संस्था म्हणून नावलौकीक असणाऱ्या रक्षा अनुसंधान व विकास संघटना ‘डीआरडीओ’ हैद्राबाद येथे शास्त्रज्ञ म्हणून त्याची निवड झाली आहे.मल्हारा येथील साहेबराव तायडे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे ते मजुरीही करतात. त्यांचा मुलगा आतिष याने मल्हारा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतच दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीत चांगले गूण मिळाल्यानंतर त्याने गौरखेडा येथील लुल्ला विद्यालयातून बारावी उत्तीर्ण केली. आतिषला वडीलांच्या आर्थिक परिस्थितीची जाण होती. त्यामुळे त्याने बारावीत चांगले गुण प्राप्त केले. त्यामुळे त्याला अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तेथून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. नोकरीस प्राधान्य न देता आणखी उच्च शिक्षण घेण्याकरिता दिल्ली गाठली. दिल्लीत त्याने भारतीय अभियांत्रिकी सेवा (आईएस) ची तयारी केली. त्यानंतर गेट (जीएटीई) च्या माध्यमातून त्याची आयआयटीसाठी दिल्लीसाठी निवड झाली. आयआयटीमध्ये त्याने शिक्षण घेतले. मात्र, यादरम्यानच त्याची डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आतिषला त्याचे काका दादाराव तायडे यांनी आर्थिक मदत केली. दहावीपर्यंत मल्हारासारख्या खेड्यातील मराठी शाळेत शिक्षण घेवून आतिष केवळ अपार मेहनत व जिद्दीच्या बळावर शास्त्रज्ञ झाला आहे. त्याच्या या यशाची पंचक्रोशीत चर्चा आहे.